कारवाई होत नसल्याने हिंदू घरे विकून स्थलांतर करण्याच्या सिद्धतेत !

संभल (उत्तरप्रदेश) – संभल जिल्ह्यातील सिरसी शहरातील चामुंडा मंदिराच्या भूमीवर मुसलमानांनी बर्याच काळापासून अतिक्रमण केले आहे. हिंदू प्रशासनाला मंदिर परिसर मुसलमानांच्या अतिक्रमणातून मुक्त करण्याची अनेक वर्षे मागणी करत आहेत; परंतु प्रशासन आश्वासन देण्याखेरीज काहीही करत नसल्याने संतप्त होऊन काही हिंदूंनी त्यांच्या घरांवर ‘हे घर विक्रीसाठी आहे’ असे लिहिलेले पोस्टर लावले.
१. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ संबंधित कुटुंबातील काही सदस्यांना कह्यात घेतले आणि चौकशी केली. विमल सैनी, हरिओम सैनी आणि पप्पू सैनी अशी या हिंदूंची नावे आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना सोडण्यासाठी प्रयत्न केले; पण बराच वेळ त्यांना सोडण्यात आले नाही, असा आरोप केला आहे.
२. हिंदूंचे म्हणणे आहे की, आता हळूहळू अनेक कुटुंबे येथून स्थलांतरित झाली आहेत. जर आम्हाला अजूनही न्याय मिळाला नाही, तर आम्हीही येथून स्थलांतर करू.
३. संभलचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पेन्सिया म्हणाले की, तिथे असे काहीही नाही. परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. जेव्हा प्रशासनाला कळले की, तेथे बेकायदेशीर अतिक्रमण आहे, तेव्हा ती जागा तात्काळ रिकामी करण्यात आली आणि महसूल पथकाने चौकशीनंतर कायदेशीर प्रक्रिया चालू केली.
४. तथापि हिंदूंचे म्हणणे आहे की, चामुंडा मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना असे होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! |