AMU founder Sir Syed Ahmad Khan : अलीगड मुस्लिम विद्यापिठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांच्यावरील चित्रपटाचे प्रसारण करण्यास दूरदर्शनने दिला नकार !

अलीगड मुस्लिम विद्यापिठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान

नवी देहली – अलीगड मुस्लिम विद्यापिठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान (वर्ष १८१७-१८९८) यांच्यावरील पहिला आत्मचरित्र चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर ओटीटी (ओटीटी म्हणजे ‘ओव्हर द टॉप’. अ‍ॅपच्या माध्यमांतून चित्रपट, मालिका आदी कार्यक्रम याद्वारे पहाता येतात.) मंचावर प्रदर्शित झाला आहे; परंतु दूरदर्शनने (‘प्रसार भारती’ने) ओटीटीवर तो प्रसारित करण्यास नकार दिला आहे. ‘सर सय्यद अहमद खान : द मसीहा’ असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे प्रकाशन अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या कुलगुरु नैमा खातून यांच्या हस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले.

या चित्रपटाचे निर्माते आणि मुख्य अभिनेते शोएब चौधरी यांनी म्हटले की,  दूरदर्शनसाठी मी बनवलेली एक मालिका दूरदर्शनच्या इतिहासात सर्वांत अधिक काळ चालली; परंतु दूरदर्शनच्या ओटीटी मंचावर प्रसारणासाठी मी बनवलेला चित्रपट अपात्र घोषित करण्यात येणे, हे धक्कादायक आहे. असे दिसते की, दूरदर्शनने त्यांच्या राजकीय मालकांना खूश करण्यासाठी माझा प्रस्ताव नाकारला आहे.

संपादकीय भूमिका

  • भारताचे विभाजन करून मुसलमानांसाठी वेगळा देश बनवण्याची कल्पना सर्वप्रथम सय्यद अहमद खान यांनीच एकोणिसाव्या शतकात मांडली होती, हे भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे दूरदर्शनने त्यांच्यावरील चित्रपटाच्या प्रसारणाला नकार दिला असेल, तर त्याचे समर्थनच करणे आवश्यक आहे !
  • दूरदर्शनने दिलेल्या नकाराला आता कुणा धर्मनिरपेक्षतावाद्यांकडून विरोध झाला, तर ज्या व्यक्तीने धर्माच्या आधारे देशाच्या फाळणीची मागणी केली, तिला या उपटसुंभांचे समर्थन असल्यावरून जनतेने त्यांना जाब विचारला पाहिजे !