सोलापूर – महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत अनेक रस्ते स्वच्छ केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. स्वच्छतेसाठी मोठी यंत्रणा लावूनही शहर अद्याप अस्वच्छच आहे. अनेक भागांत ठिकठिकाणी कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले असून त्या साठलेल्या कचर्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. (असे प्रशासन जनतेच्या करातून कशाला पोसायचे ? असा विचार नागरिकांच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)
शहरातील बाजारपेठा आणि प्रमुख चौक, रस्ते रात्रीतून स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी ६५ कर्मचार्यांची नियुक्तीही केली आहे. रात्रीच्या वेळी स्वच्छता करतांना कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी ‘रिफ्लेक्टर जॅकेट’ही दिले आहेत; मात्र रस्त्याच्या बाजूने कचरा आणि मातीचे ढीग साठलेले आहेत. साठलेला कचरा वार्यामुळे पुन्हा रस्त्यावर येत आहे. परिणामी रस्त्यावर पुन्हा कचराच कचरा दिसत आहे. (हे प्रशासनाला का दिसत नाही ? प्रशासन यावर काय उपाययोजना काढणार ? – संपादक)
संपादकीय भूमिकामहापालिका स्वच्छता कर्मचार्यांवर कुणाचा अंकूश कसा काय नाही ? अशा कर्मचार्यांना कामचुकारपणा केल्यामुळे शिक्षा देणे आवश्यक ! |