|

वसई (जिल्हा पालघर) – राज्यात देवस्थानच्या भूमी बेकायदेशीरपणे बळकावण्याचे प्रकार अनेक ठिकाणी चालू आहेत. पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अँटी लँड ग्रॅबिंग (भूमी बळकावणे विरोधी कायदा) कायदा करून कारवाई करावी, त्याची तातडीने कार्यवाही करावी, तसेच राज्यामध्ये भूमी हडपण्याविरोधी विशेष पथकाची नेमणूक करावी या मागण्या महाराष्ट्र मंदिर महासंघाने राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. या विषयाचे निवेदन वसई तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी डॉ. अविनाश कोष्टी यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. या वेळी उपस्थित पालघर जिल्ह्यांतील ८ मंदिर विश्वस्तांनी त्यांच्या मंदिरांच्या ‘लेटरहेड’वर वरील विषयाचे निवेदन दिले.
निवेदन देतांना मेढे (वसई) येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संस्थापक पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संयोजक श्री. प्रदीप तेंडोलकर, श्री जीवदानी देवी संस्थानचे विश्वस्त श्री. हेमंत म्हात्रे, माणिकपूर (वसई) येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. हेमंत पाटील, आगाशी (विरार) येथील श्री भवानी शंकर देवस्थानचे विश्वस्त श्री. माधव म्हात्रे, खजिनदार श्री. कमलेश थोपटे, वसई येथील श्री दिवाणेश्वर महादेव मंदिराचे प्रबंधक आचार्य जगदीश शास्त्री, विरार येथील श्री ग्रामदेवी मंदिराचे विश्वस्त श्री. अरुण बैरागी, तुंगारेश्वर येथील ‘बापा सीताराम सनातन सेवा ट्रस्ट’चे विश्वस्त श्री. भूपत वालिया, ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे प्रतिनिधी श्री. विनोद साहू, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विलास निकम, श्री. संदीप तुळसकर, श्री. प्रशांत पाटील, सनातन संस्थेचे श्री. प्रवीण वर्तक, सौ. सुचिता वर्तक, श्री. रमेश अष्टेकर आदी उपस्थित होते.