|
नवसारी (गुजरात) – येथील दर्गा रोड भागात ७ डिसेंबरच्या रात्री वाहन उभे करण्यावरून झालेल्या वादातून मुसलमानांनी हिंदूवर आक्रमण केल्याची घटना घडली. या वेळी हिंदु महिलांनाही मारहाण करण्यात आली. धर्मांध मुसलमानांनी हिंदूंची हत्या करून त्यांना या भागातून हाकलून देण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार प्रविष्ट केली असून हे प्रकरण धार्मिक नसून वाहन उभे करण्याच्या वादाचे आहे, असे म्हटले आहे.
Hindus attacked by bigot Mu$|!m$ over minor parking dispute in Navsari, Gujarat
A situation akin to Bangladesh is beginning to unfold in India as well!
Hindus expect that such situations should not occur given the long-standing rule of the BJP in Gujarat
Even if the incident… pic.twitter.com/siSAEC8RJE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 10, 2024
१. पीडित चंदन राठोड यांनी सांगितले की, रात्री एका हिंदु तरुणाची चारचाकी गाडी उभी करण्यावरून एका मुसलमानासमवेत वाद झाला. काही वेळाने १०० ते १५० मुसलमानांचा जमाव येथे पोचला. जमावाच्या हातात काठ्या आणि इतर हत्यारेही होती. त्यांनी उपस्थित हिंदु महिलांना मारहाण केली आणि त्यांच्यासोबत अश्लील वर्तन केले. ‘काफिर (अल्ला आणि कुराण यांना न मानणारे), इथून पळून जा. हे आमचे क्षेत्र आहे. हा तर केवळ प्रारंभ आहे’, असे ते म्हणत होते.
२. चंदन राठोड यांनी पुढे सांगितले की, दर्गा रोड परिसर मुसलमानबहुल आहे. येथे एक दर्गा आहे, ज्याच्या पुढे एक हिंदु मंदिर आहे. गेल्या ३ वर्षांपासून मुसलमान आम्हाला सण साजरा करू देत नाहीत. गणेशोत्सवात मुसलमानांनी मंडपामध्ये घुसून भजन-कीर्तन बंद पाडले होते. येथे होणार्या धार्मिक कार्यक्रमांना येणार्या हिंदु महिलांचा विनयभंग केला जातो.
आता बांगलादेशासारखी परिस्थिती भारतातही होऊ लागली आहे !
अनेक महिलांनी आक्रमणाच्या घटनेचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले आहेत. यात एका महिलेने म्हटले आहे की, हिंदु असणे गुन्हा आहे का ? त्यांनी आमचा गळा चिरून आम्हाला येथून हाकलून देण्याची धमकी दिली. आता बांगलादेशासारखी परिस्थिती भारतातही होऊ लागली आहे. आता हिंदूंना भारतात रहाण्याचा अधिकार नाही का ?
संपादकीय भूमिका
|