कर्णावती (गुजरात) – भारतीय तटरक्षक दलाच्या नौकांंची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणार्या दीपेश गोहिल या कंत्राटी कामगाराला गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. दीपेश गोहिल केवळ २०० रुपयांच्या बदल्यात पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पुरवत होता. आतापर्यंत त्याला एकूण ४२ सहस्र रुपये मिळाल्याचे सांगितले जात आहे. ओखा बंदरात काम करत असलेल्या दीपेश फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात आला होता. पाकिस्तानी गुप्तहेराने ‘साहिमा’ या टोपण नावाने दीपेशशी फेसबुकवर मैत्री केली होती. दीपेशला अटक केल्यानंतर अद्याप पाकिस्तानी हस्तकाचे खरे नाव समोर आलेले नाही.
संपादकीय भूमिकाअशांना जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा केली पाहिजे ! |