अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझर (पुणे) येथील विघ्नहर देवस्थान, आळंदी देवस्थान, पंढरपूर-तुळजापूर, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथील महत्त्वपूर्ण घडामोडींची वृत्ते आता ‘सनातन प्रभात’ला मिळत आहेत. ओझर येथे मंदिर परिषदेच्या निमित्ताने वृत्तसंकलनाची सेवा मिळाली होती. त्या वेळी विघ्नहर देवस्थानाचे तत्कालीन अध्यक्ष श्री. गणेश कवडे यांची मुलाखत घेऊन मंदिराच्या कार्याविषयी सविस्तर माहिती ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध केली होती. यानंतर तेथील मंदिरांशी जवळीक झाल्यावर आता तेथील मंदिराची वृत्ते मिळतात. याचप्रकारे यंदा आषाढी वारीच्या काळात वारी देहू-आळंदी येथून निघाल्यापासून पंढरपूर येथे पोचेपर्यंत सर्व वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’साठी आम्हाला मिळवता आली.
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर