दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तीचे नदीमध्ये विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले. त्यामुळे भाविकांनी घाटावरील कृत्रिम हौदात विसर्जन केले, तर काही भाविकांनी घरातील हौदात किंवा बादलीमध्ये श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केले. (महापालिका नदीपात्रात विसर्जन करण्यास बळजोरीने बंदी घालते, तर मोठ्या प्रमाणात कृत्रिम विसर्जन हौद, श्री गणेशमूर्ती संकलन केंद्र असे धर्मद्रोही पर्याय भाविकांवर लादत आहे. भाविकांनी वहात्या पाण्यात विसर्जनासाठी आग्रही रहावे ! – संपादक)