मुंबई – अभिनेते सैफ अली खान यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री गणेशचतुर्थी साजरी करत आहे. त्यांनी घरी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. त्यांनी याविषयीची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली. यानंतर मुसलमानांकडून तिला विरोध करण्यात येत आहे, तर हिंदूंकडून तिचे कौतुक केले जात आहे.
सामाजिक माध्यमांतून त्यांना ‘काफीर’ (इस्लामला न मानणारा, मूर्तीपूजक) म्हटले जात आहे. ‘आम्ही तिला मुसलमान मानत नाही. तिचे केवळ नाव मुसलमान आहे’, ‘आम्हाला लाज वाटते, तू मुसलमान आहेस’, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदु अभिनेते, अभिनेत्री, तसेच नामांकित लोक अजमेरच्या दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी जातात किंवा इफ्तारच्या वेळी राजकीय नेते गोली टोपी घालतात ते योग्य आणि एखाद्या मुसलमान अभिनेत्री घरी श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली, तर ते चुकीचे, हाच धर्मांध मुसलमानांचा ‘सर्वधर्मसमभाव’ आहे, हे लक्षात घ्या ! |