कोलार (कर्नाटक) – येथील रेहमतनगरमध्ये एका गायीचे पोट, पाठ आणि नाक यांवर आम्ल, तसेच उकळलेले तेल टाकल्याची घटना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घडल्याचे समोर आले. यामुळे या गायीची त्वचा भाजली. गाय नंतर येथून बेपत्ता झाली. याविषयी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गलपेट पोलीस ठाण्यात तक्रार केली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घायाळ झालेल्या गायीचा शोध घेऊन उपचार करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकापूर्ण जगात केवळ भारतात गायीला देवता म्हणून पुजले जाते, अशा भारतात गायींवर अत्याचार होणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! संबंधितांना आता फाशीचीच शिक्षा करणारा कायदा करणे आवश्यक आहे ! |