चांगली आकलनक्षमता आणि गुरुदेवांप्रती भाव असलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल, रायगड येथील कु. ईश्वरी बळवंत पाठक (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. ईश्वरी पाठक ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. ईश्वरी बळवंत पाठक हिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे.’ – संकलक)

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कु. ईश्वरी पाठक

१. अभ्यासाविषयी गांभीर्य

सौ. अर्पिता पाठक

‘कु. ईश्वरीला अभ्यासाविषयी गांभीर्य आहे. ती शाळेत सांगितलेल्या सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन करते. मी व्यस्त असल्याने मला तिचा अभ्यास घेता येत नाही. ती स्वतःच तिचा अभ्यास पूर्ण करते.

२. चांगली आकलनक्षमता

तिची आकलनक्षमता चांगली आहे. तिला मोठ्या माणसांप्रमाणे पुष्कळ गोष्टी लक्षात येतात. तिला वाचनाची विशेष आवड आहे. ती केवळ गोष्टी नाही, तर वेगवेगळे तात्त्विक विषय वाचते. त्यावर तिचे लगेच चिंतन होते. ती ते विषय वाचून ‘आपण आपल्यामध्ये असे पालट करायला हवेत’, असे मला सांगते.

३. समंजस

ईश्वरी २ वर्षांची असल्यापासून तिचे वडील (श्री. बळवंत पाठक, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४० वर्षे) सेवेनिमित्त बाहेर असतात. ते तिला भेटायला कधीतरी येतात. तेव्हा ती हट्ट करत नाही. तिच्या लहानपणापासून आम्ही काही वर्षांनी आमचे निवासस्थान पालटतो. तेव्हा ती काहीही गार्‍हाणे न करता नवीन ठिकाणी रहाते.

४. सात्त्विकतेची आवड

ईश्वरीला सात्त्विक वातावरणात आणि संतांच्या सान्निध्यात रहायला आवडते. तिला सेवाकेंद्रातून घरी निघतांना वाईट वाटते. मागील वर्षी ती सुटीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर तेथून निघतांना तिला पुष्कळ रडू आले. एकदा ती तिच्या वडिलांच्या समवेत समाजातील एका संतांच्या भेटीला गेली होती. ईश्वरीला त्यांच्यामधील चैतन्य जाणवले. तिने मला सांगितले, ‘‘त्या संतांकडून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत होते.’’

५. सेवेची आवड

ईश्वरी सेवाकेंद्रातील विविध सेवांमध्ये सहभागी होते.

६. चुकांविषयी संवेदनशील

ईश्वरीला सुटी असल्यावर आम्ही ३ – ४ घंटे सेवाकेंद्रात जाण्याचे नियोजन करतो. एकदा सेवाकेंद्रात जाण्यापूर्वी मी तिला तिच्याकडून झालेल्या चुकीची जाणीव करून दिली. तेव्हा ‘स्वतःकडून पुन्हा चूक व्हायला नको’, असा विचार करून ती गंभीर झाली. तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला स्वभावदोषांवर मात करायला जमेल का ? मी शिकून घेण्याचा प्रयत्न करीन.’’ आम्ही सेवाकेंद्रात गेल्यावर ईश्वरीने स्वतःहून फलकावर चूक लिहिली.

७. नामजपादी उपाय करणे

तिला काही वेळा आध्यात्मिक त्रास होतो. तेव्हा तिला नामजपादी उपायांची आठवण केल्यावर ती लगेच नामजपादी उपाय करते. तिला त्याचा लाभ होतो.

८. भाव

८ अ. देवाप्रती भाव : ईश्वरी देवघरातील देवांची पूजा ‘तेथे प्रत्यक्ष देवता आहेत’, या भावाने करते. ती ‘देवतांना थंडी लागू नये आणि त्यांच्या डोळ्यांत गंध जाऊ नये’, याची काळजी घेते.

८ आ. संतांप्रती भाव : एकदा एका शिबिरात सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५५ वर्षे) यांची उपस्थिती होती. शिबिर झाल्यावर ईश्वरीने सांगितले, ‘‘मला संतांना नमस्कार करायचा आहे.’’ तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘संतांना मानस नमस्कार करायचा असतो.’’ तेथून निघण्यापूर्वी आम्ही संतांचा निरोप घेत असतांना ईश्वरीला रहावले नाही; म्हणून तिने संतांना स्थुलातून नमस्कार केला. एकदा मी चेन्नई येथील शिबिरासाठी समन्वय करत होते. तेव्हा पू. (सौ.) उमा रवीचंद्रन (सनातनच्या ७० व्या संत, वय ५८ वर्षे) यांच्या घरी साधकांच्या निवासाचे नियोजन करायचे होते. ईश्वरीला याविषयी कळल्यावर ती मला म्हणाली, ‘‘संतांच्या घरी साधकांच्या निवासाचे नियोजन करू नका. संतांनी साधकांची सेवा करायची नसते. साधकांनी संतांची सेवा करायची असते.’’ तिला पू. उमाक्कांविषयी विशेष माहिती नाही आणि तिची त्यांच्याशी ओळख नाही. ‘तिच्यामधील भावामुळे तिच्या हे लक्षात आले’, याचे मला विशेष वाटले.

८ इ. गुरुदेवांप्रती भाव : मागील वर्षी मे मासाच्या सुटीत ईश्वरी १५ दिवस रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहिली होती. तेव्हा तिला संत म्हणाले होते, ‘‘पुढील वर्षी पूर्ण सुटीत येथेच रहा.’’ या वर्षी तिच्या समवेत जायला कुणी नसल्याने तिला रामनाथी आश्रमात जायला जमणार नव्हते. तेव्हा ‘संतांचे आज्ञापालन होणार नाही’, याचे तिला वाईट वाटले.

९. ईश्वरी हिचे स्वभावदोष

वेळ वाया घालवणे, अनावश्यक बोलणे, ‘स्वतःला महत्त्व मिळावे’, असे वाटणे आणि तुलना करणे.
‘गुरुमाऊली, आपण मला या दैवी जिवाचे संगोपन करण्याची संधी दिली आहे’, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’

– सौ. अर्पिता पाठक (कु. ईश्वरीची आई), पनवेल, रायगड.

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.