‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार अनुराधा पौडवाल यांना घोषित !
मुंबई – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून वर्ष २०२४ मधील राज्याचे विविध सांस्कृतिक पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना घोषित करण्यात आला आहे.
यामध्ये ‘जीवनगौरव’ पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम ३ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप आहे.
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये अन्य १२ पुरस्कार देण्यात आले आहेत. नाटक या विभागासाठी श्रीमती विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत – डॉ. विकास कशाळकर, कंठसंगीत – सुदेश भोसले, लोककला – अभिमन्यू धर्माजी सावदेकर, शाहिरी – शाहिर राजेंद्र कांबळे, नृत्य – सौ. सोनिया परचुरे, चित्रपट – श्रीमती रोहिणी हट्टंगडी, कीर्तन प्रबोधन – संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत – पांडुरंग मुखडे, कलादान – नागेश सुर्वे, तमाशा – कैलास सावंत, आदिवासी गिरीजन – शिवराम शंकर धुटे यांना घोषित करण्यात आले आहेत. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केलेले आहे. हे पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.