जागतिक शक्तींनी बांगलादेशातील हिंदूंचे प्राण आणि मालमत्ता यांचे रक्षण करावे ! – जगद़्गुरु नरेंद्रचार्य महाराज

नाणीज, ९ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशामध्ये माजलेली अराजकता आणि हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबले पाहिजेत. अन्यथा आम्हा हिंदूंना हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे लागेल, अशी वेळ येऊन ठेपली आहे. क्षुल्लक कारण शोधून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. बांगलादेश येथे लोकसंख्येच्या ८.५४ टक्के हिंदू आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्य आहेत; म्हणूनच जाणीवपूर्वक हिंदूंची मंदिरे, घरे, मुलांची वसतीगृहे, व्यवसायाची ठिकाणे लक्ष्य केली जात आहेत. यामागे वेगवेगळे देश आणि साम्यवादी यांचे षड्यंत्र आहे. ‘हिंदु धर्म’ संपवावा, हा त्यामागील उद्देश आहे, हे प्रकर्षाने लक्षात येते. जागतिक व्यवस्थेने आमच्या हिंदूंची मालमत्ता, जीवन, न्याय, हक्क, धार्मिकता यांचे संरक्षण करावे, असे आवाहन जगद़्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. या वेळी त्यांनी बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्या अत्याचारांचा तीव्र निषेध केला.
जगद़्गुरु नरेंद्राचार्य महाराज पुढे म्हणाले की, हिंदू सहिष्णु आहेत, लाचार नाहीत. बांगलादेशातील घटनांवर भारतातील विविध पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. असाच नरसंहार तुम्ही चालू देणार का ? हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनेही पुढाकार घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणला पाहिजे.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक