रजस्वला स्त्री आणि शास्त्र  !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘विवाह जुळवण्यापूर्वी पाहिली जाणारी काही तत्त्वे, भारतीय हिंदु समाजातच विवाहपरंपरा सहस्रो वर्षे टिकून आहेत आणि सप्तपदीत करावयाच्या प्रतिज्ञा !’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.  
(लेखांक ३३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/822197.html

प्रतिकात्मक छायाचित्र

१. मासिक धर्म पाळणे महत्त्वाचे !

अलीकडे अनेक स्त्रिया मासिक धर्म पाळत नाहीत. हे त्यांच्यासाठी हानीकारक आहेच; पण त्यांच्या सहवासातील लोक आणि संतती यांच्यासाठी अत्यंत घातक आहे. मासिक धर्माच्या काळात बाजूला बसणे, ही अंधश्रद्धा किंवा खुळी कल्पना नाही. ती अत्यंत शास्त्रीय आणि हितकारक गोष्ट आहे. रजस्वलेने कसे वागावे, याचे नियम आयुर्वेदाने घालून दिले आहेत. त्यांचे पालन न करण्याचे परिणाम काय आहेत ?, तेही सांगितले आहेत.

अलीकडे काही सुशिक्षित कुटुंबे स्त्री रजस्वला असतांना घरात देवांची पूजा करत नाहीत; कारण ती ‘दिवस’ पाळत नाही. तिच्या चौथ्या दिवशी ‘गोमूत्र शिंपडून सर्व पावन झाले’, असे समजतात. गोमूत्राने येणारी शुद्धता ही अज्ञानाने प्राप्त होणार्‍या आणि अज्ञात असलेल्या अशुद्धतेवरच उतारा आहे. विषप्राशन करून गोमूत्र शिंपडले, तर मृत्यू टळेल का ?

पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

२. पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी रजस्वलेविषयी केलेले संशोधन !

रजस्वलेचा स्पर्श, घाम, वस्त्रे ही अपवित्र आणि विषयुक्त असतात. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या नोव्हेंबर १९४९ च्या अंकात प्रा. रेड्डी आणि प्रा. गुप्ता यांनी काही पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन दिले आहे.

‘रजस्वलेच्या घामाने झाडांचा मोहोर नष्ट होतो. या घामाच्या स्पर्शाने बेडकाच्या हृदयाचे ठोके मंद झाले आणि सशाच्या आतड्यांची हालचाल वेगाने चालू झाली. लेनेझोस नावाच्या शास्त्रज्ञाला वर्ष १९३० मध्ये आढळून आले की, रजस्वलेने १० ते १५ मिनिटे बेडूक धरल्यावर त्याच्या रक्तवाहिन्या आणि स्नायू यांची गती मंदावली.’

या कालखंडात स्त्रीला विश्रांतीची आवश्यकता असते. शाळा-महाविद्यालयात जाणार्‍या मुली धावतात, पळतात, खेळतात, उड्या मारतात. हे सारे मासिक धर्माच्या काळात आरोग्यविरोधी आहे. ज्याप्रमाणे सिगारेट ओढणार्‍यापेक्षा जवळच्यांवरच धुराचा दुष्परिणाम अधिक होतो, त्याचप्रमाणे रजस्वलेला स्वतःला होणार्‍या त्रासांपेक्षा संपर्कात येणार्‍यांना अधिक त्रास होतो. हे दूरगामी परिणाम तात्काळ न जाणवणारे असल्याने लोक त्यांची उपेक्षा करतात.’

– भारताचार्य आणि धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

बुद्धीप्रामाण्यवाद आणि मानव !

‘मानवेतर प्राण्यांनाही बुद्धी असते. त्यांचे सर्व निर्णय बुद्धीच्या निकषावरच घेतले जातात. त्याविना त्यांच्याजवळ दुसरे काहीच साधन नाही. तेच बुद्धीप्रामाण्यवादी असतात. मनुष्याजवळ ‘शास्त्र’ हे निर्णयाचे साधन आहे; म्हणून म्हटले आहे,

‘तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।’
(श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोक २४)

म्हणजे ‘म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे.’

अर्थ : काय करावे आणि काय करू नये, हे ठरवण्याचे ‘शास्त्र’ हेच प्रमाण आहे.

– भारताचार्य आणि धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/823610.html