साधकांच्या मनी वसे ती गुरुमाऊली ।

आतापर्यंत मी कधीच कविता केलेली नाही. प.पू. डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला ही कविता सुचली. त्यांनीच माझ्या प्रकृतीमधे हा पालट केला आहे, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वराचे तुम्ही (टीप १) अवतार ।
त्यामुळे झाली साधकांवर कृपा अपार ।। १ ।।

हिंदुत्वासाठी जन्म घेतला ।
ब्रह्मांडाचा भार झेलला ।। २ ।।

श्री. गिरीश पाटील

गुरुपरंपरा आहे ही थोर ।
घट्ट आहे तुमची प.पू. बाबांशी (टीप २) नात्याची दोर ।। ३ ।।

पूर्ण जगात केला अध्यात्माचा तुम्ही प्रसार ।
साधना शिकवली तुम्ही कालमहात्म्यानुसार ।। ४ ।।

साधकांवर असे ज्यांच्या कृपेची सावली ।
साधकांच्या मनी वसे ती गुरुमाऊली ।। ५ ।।

दिली सर्वांना प्रीतीची छाया ।
अलिप्त केली साधकांची माया ।। ६ ।।

साधकांसाठी घेतला भक्तीचा वर्ग ।
त्यातूनी दाखवला ईश्वरप्राप्तीचा मार्ग ।। ७ ।।

जसे पाणी घालुनी वाढवतो आपण वृक्षाला ।
तसे प्रक्रिया (टीप ३) राबवूनी गुरुदेव नेतात साधकांना मोक्षाला ।। ८ ।।

प्रार्थना करतो ईश्वराला स्मरूनी ।
व्यक्त करतो कृतज्ञता गुरुदेवांच्या चरणी ।। ९ ।।

टीप १ : सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले

टीप २ : प.पू. भक्तराज महाराज

टीप ३ : स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुण वाढवण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गाच्या अंतर्गत केलेले प्रयत्न.

– श्री. गिरीश पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक