Serial Shooting Controversy : मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी श्री गुरु ग्रंथसाहिबचा (शिखांचा पवित्र ग्रंथ) अवमान झाल्याचे सांगत निहंग शिखांकडून तोडफोड !

  • मोहाली (पंजाब) येथील घटना

  • कर्मचार्‍यांना केली मारहाण

मोहाली (पंजाब) – येथे ‘उडियान’ या दूरचित्रवाहिनीवरील मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी निहंग शिखांनी आक्रमण करत नेपथ्याची तोडफोड केली, तसेच निर्मितीमधील कर्मचार्‍यांना मारहाण केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोचून सर्वांना पोलीस ठाण्यात नेले. निहंग शिखांनी येथे गुरुद्वाराची प्रतिकृती बनवण्याला विरोध करत अशा प्रतिकृतीमुळे श्री गुरु ग्रंथसाहिबचा अपमान झाल्याचा आरोप केला.

१. येथे शीख परंपरेनुसार विवाहाचे दृश्य चित्रीत करण्यात येणार होते. त्यासाठी गुरुद्वारा उभारण्यात आला होता. प्रसंगाच्या दृश्याच्या ३ ग्रंथींनाही (गुरुद्वारामधील पुजारी) पाचारण करण्यात आले होते; मात्र त्यानंतर निहंग शीख आले आणि त्यांनी तोडफोड अन् मारहाण केली.

२. पोलिसांनी हे प्रकरण नीट हाताळले नाही, तर आम्ही हे प्रकरण आमच्या हातात घेऊ, अशी धमकी निहंग शिखांनी दिली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी संपूर्ण नेपथ्याचा व्हिडिओ बनवला आहे. ग्रंथींना प्रत्येकी एक सहस्र रुपये देऊन येथे आणण्यात आले आहे. सर्वांत दुःखाची गोष्ट म्हणजे शिखांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या गुरूंचा अनादर होत होता.

३. या घटनेची माहिती मिळताच पंजाबी अभिनेते जर्नेल सिंह तेथे पोचले. ते म्हणाले की, मी स्वतः शीख आहे. येथे शिखांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. चित्रपटात शीख तरुणाचा विवाह दाखवणे, हा कोणत्याही समाजासाठी चांगला उपक्रम आहे, त्यासाठी एक पद्धत किंवा मार्ग असला पाहिजेे. ‘शिरोमणी प्रबंधक समिती’ने चित्रपटांच्या वेळी श्री गुरु ग्रंथसाहिबची प्रत नेण्याविषयीचे नियम बनवावेत.

संपादकीय भूमिका

  • निहंग शिखांकडून सातत्याने कायदा हातात घेण्याचे प्रकार घडत असून त्याकडे आता गांभीर्याने पहात अशांना शस्त्र बागळण्याची अनुमती नाकारण्यात आली पाहिजे, अशी मागणी आता जनतेने केली पाहिजे !
  • मुसलमानांप्रमाणे शीखही त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर कायदा हातात घेतात आणि त्यांना कुणी विरोध करत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने जरी विरोध केला, तरी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डोस पाजला जातो !