TMC MP Saket Gokhale : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नीला ५० लाख रुपये हानी भरपाई देण्याचा आदेश

  • तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांना मानहानी प्रकरणी देहली उच्च न्यायालयाचा दणका !

  • इंग्रजी वर्तमानपत्रात आणि ‘एक्स’वर क्षमापत्र प्रसारित करण्याचाही आदेश !

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले व संयुक्त राष्ट्रांच्या माजी साहाय्यक सरचिटणीस लक्ष्मी पुरी

नवी देहली – तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांना देहली उच्च न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी (संयुक्त राष्ट्रांच्या माजी साहाय्यक सरचिटणीस) यांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला. यासह एका इंग्रजी वृत्तपत्रात क्षमापत्र छापून आणून ते ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावरही प्रसारित करण्याचाही आणि हे क्षमापत्र पुढील ६ महिन्यांपर्यंत प्रसारित करण्याचा आदेश दिला आहे.

साकेत गोखले यांनी १३ आणि २३ जून २०२१ या दिवशी लक्ष्मी पुरी आणि त्यांचे पती हरदीपसिंह पुरी यांच्याविरुद्ध खोटे अन् अपकीर्त करणारे आरोप केले होते. तसेच ‘त्यांनी काळ्या पैशांतून जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे घर खरेदी केले’, असाही आरोप केला होता.