|
नवी देहली – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवले; मात्र त्याच वेळी भाजपच्या संख्याबळात मोठी घट झाली आहे. भाजपला मागील निवडणुकीत ३०३ जागा मिळाल्या होत्या; मात्र या वेळी भाजपला २४० जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसप्रणीत इंडि आघाडी २३० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे.
Lok Sabha #Electionresultupdate
BJP alliance leading the charts.
👉 BJP sees significant decline in the number of seats won.
👉 BJP suffers huge setback in Uttar Pradesh, Bengal, Rajasthan, Maharashtra and Karnataka.
👉 Congress alliance also attempting to form Government.… pic.twitter.com/UH5IUXRx78
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 4, 2024
मतदानोत्तर चाचणींमध्ये भाजप आघाडीला ४०० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र हे सर्वच अंदाज चुकल्याचे दिसून आले आहे. त्याच वेळी काँग्रेस आघाडीला १५० ते १७० जागा मिळतील दावा करण्यात आला होता. हाही दावा चुकला असल्याचे दिसून आले.\
उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीला लाभ
उत्तरप्रदेशमध्ये भाजपला वर्ष २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी ३६ जागेवर समाधान मानावे लागले आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीला ४२ जागा मिळाल्या आहेत. येथे मुसलमानांची एकगठ्ठा मते या पक्षांना मिळाल्याने त्यांना या जागा मिळत आहेत, असे म्हटले जात आहे.
काँग्रेस प्रणीत इंडि आघाडीचा सरकार स्थापण्यासाठी प्रयत्न
भाजप आघाडीला बहुमत मिळाले असले, तरी विरोधी काँग्रेस प्रणीत इंडि आघाडीही सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजप आघाडीमधील पक्षांशी संपर्क साधण्यात येत आहेत. त्यांना इंडि आघाडीसमवेत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रज्वल रेवण्णा पराभूत
कर्नाटकातील जनता दल सेक्युलर पक्षाचे (जेडीएस्चे) हासन लोकसभा मतदरासंघातील उमेदवार प्रज्वल रेवण्णा याचा पराभव झाला आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर शेकडो महिलांचे लैंगिक शोषणाचा केल्याचा आरोप असून त्यास अटक करण्यात आली आहे.
अमेठीमध्ये स्मृती इराणी यांचा पराभव
उत्तरप्रदेशातील अमेठीत लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे. त्यांना काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल यांनी पराभूत केले आहे.
राहुल गांधी वायनाडमधून विजयी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चालू असून राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून दोन लाख मतांनी आघाडीवर आहेत, तसेच उत्तर प्रदेशातील रायबरेली येथूनही आघाडीवर आहेत.
अयोध्येत समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी
उत्तरप्रदेशातील अयोध्या मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांचा विजय झाला आहे. भाजपचे उमदेवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला आहे. अयोध्येत श्रीराममंदिराची निर्मिती करूनही त्याचा लाभ भाजपला झाला नाही. यामागे मुसलमानांची एकगठ्ठा मते आहेत, असे म्हटले जात आहे.