एक दांपत्य घायाळ

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये १८ मेच्या रात्री २ ठिकाणी जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमणे केली. यांतील पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या एका दांपत्यावर गोळीबार केला. यात घायाळ झालेले फराह आणि तबरेज यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. हे दांपत्य जयपूर येथून आले होते. दुसर्या घटनेत आतंकवाद्यांनी शोपियांच्या हीरपोरामध्ये भाजपचे स्थानिक नेते एजाज अहमद शेख यांच्यावर गोळ्या झाडल्या. एजाज अहमद यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. एजाज अहमद हे माजी सरपंच होते.
संपादकीय भूमिका३५ वर्षांनंतरही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट न होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! |
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
CJP Party : कॉकरोच जनता पक्षाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये नाच-गाण्यासह मेजवानी !
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार