नवी देहली – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात् ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (‘आय.सी.एम्.आर्.’ने) नुकत्याच आरोग्यविषयक काही सूचना प्रसारित केल्या आहेत. यात म्हटले आहे की, वनस्पती तेल किंवा कोणत्याही प्रकारचे तेल पुन्हा पुन्हा गरम करणे टाळले पाहिजे. तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यात विषारी तत्त्व निर्माण होतात, जे हृदयरोग आणि कर्करोग होण्याचा धोका वाढवतात.
१. आय.सी.एम्.आर्.ने सांगितले की, तेलात काही तळल्यानंतर पुन्हा काही तळण्यासाठी ते तेल वापरू नका. एकदा पदार्थ तळल्यानंतर शिल्लक राहिलेले तेल १-२ दिवसात वापरून संपवा.
२. आधीच्या काही संशोधनांतून समोर आले होते की, जेवण बनवण्यासाठी वापरले जाणारे तेल पुन्हा गरम केल्याने त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे सूज आणि वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो.