बेंगळुरू (कर्नाटक) : येथे ‘झेप्टो’ या घरपोच किराणा पोचवणार्या आस्थापनाच्या अहमद लष्कर या ‘डिलिव्हरी बॉय’ने एका ग्राहकाशी असभ्य वर्तन केले. ईशान शर्मा असे ग्राहकाचे नाव असून अहमदने त्यांच्या गुप्तांगाला दोनदा स्पर्श केल्याचा कटू अनुभव ‘एक्स’द्वारे त्यांनी सांगितला.
घटना २६ एप्रिल या दिवशी घडली. अहमदने ईशान यांच्या घरी जाऊन मागवलेल्या वस्तू त्यांना दिल्या. त्या वेळी अहमदने ईशान यांच्या गुप्तांगाला स्पर्श केला. हे चुकून झाले, असे वाटून ईशान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु दुसर्यांदा पुन्हा तसाच स्पर्श केल्यावर अहमद हे मुद्दामहून करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवताच अहमद पसार झाला. ही माहिती शर्मा यांनी पोलिसांना दिली. यावर पोलिसांनी ‘स्थानिक पोलीस ठाण्यात प्रकरण प्रविष्ट (दाखल) करावी’, असे उत्तर दिले.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |