सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे औषधोपचारांचा लाभ होऊन कर्करोगासारख्या दुर्धर आजारातून बरे झाल्याची साधिकेच्या नातेवाइकाला आलेली अनुभूती !

कर्करोगासारख्या गंभीर दुखण्यातही रुग्णाने किंवा इतरांनी रुग्णासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार (टीप १) नामजप केल्यावर त्याचा लाभ होऊन रुग्णाचे शरीर औषधोपचाराला सकारात्मक प्रतिसाद देते, तसेच रुग्णाच्या आजारपणाचा कालावधी न्यून होऊन तो पुष्कळ लवकर बरा होतो. ‘या नामजपाचा कसा आणि किती लाभ होतो ?’, याविषयी या रुग्णाचे उदाहरण पुष्कळ काही सांगून जाते. नामजपामुळे ‘मन सकारात्मक होणे’, हा मोठा लाभही मिळतो. सकारात्मकतेमुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

एका साधिकेच्या नातेवाइकाला चौथ्या टप्प्याचा रक्ताचा कर्करोग झाला होता. ती या आजारपणातून वाचणे अशक्य होते; पण औषधोपचार आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने ती या आजारातून बरी झाली.

या लेखातून ‘आजारपणात रुग्णाने आणि त्याच्या नातेवाइकांनी नामजपादी उपाय केल्यास त्यांना कसा लाभ होतो ?’, हे सर्वांना शिकायला मिळेल अन् त्यांची नामजपावरील श्रद्धा वाढून तेही अशा कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाऊ शकतील’, यात शंका नाही.

टीप १ – प्राणशक्तीवहन पद्धत : कुठल्याही रोगात किंवा आजारपणात मनुष्याच्या प्राणशक्ती (चेतना) वहनामध्ये अडथळे निर्माण होतात. मनुष्याच्या हाताची ५ बोटे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश यांचे प्रतिनिधित्व करतात. मनुष्याच्या हातातून सतत बाहेर पडणार्‍या या चेतनाशक्तीचा उपयोग शरिरात निर्माण झालेल्या अडथळ्यांच्या ठिकाणी केल्यास ते अडथळे न्यून होतात. याला ‘प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय करणे’, असे म्हणतात. (भाग १)

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. एका नातेवाइकाला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान होणे

‘माझ्या एका नातेवाइकाला ती १८ वर्षांची असतांना ‘रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर)’ झाल्याचे निदान झाले. एक मास तिच्या शरिराला पुष्कळ खाज सुटत होती. तिला १५ दिवसांपासून पुष्कळ खोकला येत होता आणि तिच्या हनुवटीच्या ठिकाणी गाठ झाली होती. त्या वेळी कोरोना महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात दळणवळण बंदी लागू झाली होती.

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी रुग्ण नातेवाइकाच्या शरिरातील कर्करोगाच्या गाठींची स्थाने अचूक ओळखून त्यावर नामजपादी उपाय सांगणे

मी लगेच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना तिची स्थिती सांगितली. सद्गुरु काकांनी ‘तिच्या शरिरात ३ मोठ्या गाठी असून दोन गाठी छातीत आणि एक गाठ हिरडीच्या ठिकाणी आहे’, असे मला सांगितले. तिच्या वैद्यकीय अहवालातही तसेच आले. यातून ‘संतांना शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास अचूक कळतात’, हे माझ्या लक्षात आले. सद्गुरु काकांनी आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र यांवर न्यास करायला सांगून ‘महाशून्य’ हा नामजप करायला सांगितला.

३. रुग्ण नातेवाइकाला रुग्णालयात भरती केल्यावर जाणवलेली सूत्रे

३ अ. सर्वत्र कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे रुग्ण नातेवाइकाला रुग्णालयात भरती करून घेणे कठीण असतांना गुरुकृपेने गावातील एका रुग्णालयाने तिला भरती करून घेणे : गावातील रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण होते आणि रुग्ण नातेवाइकाला ‘न्यूमोनिया’ झाला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात भरती करून घेणे कठीण होते. भगवंताच्या कृपेने गावातील एका रुग्णालयाने तिला भरती करून घेतले. त्यांनी खोकल्यावरील उपचार चालू करण्यासाठी तिला दुसर्‍या विशेष सुविधा असणार्‍या रुग्णालयात हलवायला सांगितले.

३ आ. शल्यतज्ञांनी रुग्ण नातेवाइकाची ‘बायोप्सी’ करणे आणि तिला चौथ्या टप्प्याचा रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान करणे : त्या रुग्णालयातील शल्यविशारद (सर्जन) आधुनिक वैद्यांनी तिची ‘बायोप्सी’ (Biopsy) (टीप २) केल्यावर सांगितले, ‘‘तिला चौथ्या टप्प्याचा (‘स्टेज’चा) रक्ताचा कर्करोग (Blood cancer) झाला आहे.’’ त्यांनी तिच्या संपूर्ण शरिराचे तातडीने ‘पेट स्कॅन’ (pet scan) (टीप ३) करायला सांगितले.

टीप २ – बायोप्सी : विविध रोगांचे निदान करण्यासाठी केली जाणारी वैद्यकीय प्रक्रिया. यामध्ये शरिरातील ऊती (पेशींचा समूह) किंवा पेशी यांचा नमुना घेणे आणि सूक्ष्मदर्शकाखाली तपासणे समाविष्ट आहे.

टीप ३ – पेट स्कॅन : या तपासणीद्वारे ‘कर्करोग शरिराच्या कोणकोणत्या भागात पसरला आहे ?’, हे कळते.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने रुग्ण नातेवाइकाचा निवास आणि भोजन यांची व्यवस्था होणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझ्या रुग्ण नातेवाइकाच्या मैत्रिणीच्या ओळखीच्या एका गृहस्थांनी ८ दिवस निवास, अल्पाहार आणि जेवण यांची सर्व व्यवस्था चांगली केली होती. यातून ‘साधकांवर संकट आले, तर गुरु कोणाच्या तरी माध्यमातून साहाय्य करतात’, हे मला अनुभवता आले.

४. रुग्ण नातेवाइकावर कर्करोगावरील उपचार चालू असतांना जाणवलेली सूत्रे

४ अ. रुग्ण नातेवाइकावर एक वर्षभर ‘किमोथेरेपी’चे उपचार चालू असणे आणि तिला पुष्कळ त्रास होत असूनही तिने चांगला अभ्यास करून परीक्षेत पहिला क्रमांक पटकावणे : मार्च २०२० मध्ये एका शहरामध्ये  तिच्यावर उपचार चालू करण्यात आले. तिथे तिच्यावर ‘किमोथेरेपी’ (कर्करोगावरील औषधप्रणाली) चालू केली. जवळजवळ एक वर्षभर तिला प्रत्येक मासाला ‘किमोथेरेपी’ देत होते. प्रत्येक मासाला ती महाविद्यालयातून ‘किमोथेरेपी’साठी एकटी रुग्णालयात जायची. तिथे तिचे वडील घरून यायचे. ‘किमोथेरेपी’ पूर्ण झाल्यावर ती काही दिवस घरी राहून मग पुन्हा महाविद्यालयात जायची. तिला पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही तिने चांगला अभ्यास केला आणि ती परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

४ आ. औषधोपचार आणि नामजप यांमुळे कर्करोगाचे प्रमाण न्यून होणे अन् आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘अस्थिमज्जा प्रत्यारोपण उपचार’ चालू करणे : नोव्हेंबर २०२१ पर्यंत ‘सर्व काळजी घेणे आणि नामस्मरण करणे’, यांमुळे तिच्या रक्तातील कर्करोगाचे प्रमाण न्यून झाले. तेव्हा तज्ञ आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘अस्थिमज्जा प्रत्यारोपण (Bone marrow transplant) (टीप ४) केल्यावर तो रोग पुन्हा उद्भवत नाही. हा उपचार २५ दिवसांचा आहे.’’ त्यानंतर तिच्यावर ‘अस्थिमज्जा प्रत्यारोपण उपचार’ चालू केले.

टीप ४ – अस्थिमज्जा प्रत्यारोपण : रोग, संसर्ग किंवा ‘किमोथेरपी’ यांमुळे खराब झालेली किंवा नष्ट झालेली अस्थिमज्जा पालटण्यासाठी करण्यात येणारी एक वैद्यकीय प्रक्रिया.

४ इ. अस्थिमज्जा प्रत्यारोपण उपचार चालू असतांना नातेवाइकाला अनेक शारीरिक त्रास होणे : हा उपचार चालू असतांना रुग्णाला जंतूसंसर्ग (‘इन्फेक्शन’) होऊ नये; म्हणून त्या खोलीत नातेवाइकांना प्रवेश नसतो. रुग्णावर हा उपचार चालू असतांना रुग्णाला ‘उलट्या होणे, तोंड येणे, रक्ताच्या उलट्या होणे, जेवण न जाणे, झोप न लागणे’, असे अनेक त्रास सतत होतात. २५ दिवसांतील पहिले १५ दिवस तिला काही त्रास झाला नाही. नंतर ३ दिवस अकस्मात् तिला १०४ अंश फॅरनहाइट ताप आला. तिला लघवीलाही त्रास होत होता. हा उपचार चालू असतांना तोंडात जखमा झाल्यामुळे आणि उलट्या होत असल्यामुळे तिला जेवण जात नव्हते. जंतूसंसर्गामुळे तिला ताप आला. अधिक शक्तीची औषधे देऊन तिचा ताप न्यून झाला.

४ ई. रुग्ण नातेवाइकाची गंभीर स्थिती ऐकून ‘काहीतरी वाईट घडणार असून परात्पर गुरु डॉ. आठवले त्यातून बाहेर काढतील’, असा विचार मनात येणे : ३०.११.२०२१ या दिवशी मी तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तिच्या आईला संपर्क केला. तेव्हा मला समजले, ‘तिला लघवी होत नव्हती. त्यामुळे तिचे पोट फुगले होते. तिला लघवीसाठी नळी (कॅथेटर) लावली हाेती.’ ते ऐकून माझे मन बधीर झाले. मला काहीच सुचत नव्हते. तिच्या या स्थितीविषयी ऐकल्यावर मला वाटले, ‘तिची स्थिती गंभीर आहे.’ त्या वेळी माझ्या मनात सारखा विचार येत होता, ‘काहीतरी वाईट घडणार आहे; पण त्यातून परात्पर गुरु डॉक्टरच बाहेर काढतील.’

४ उ. रुग्ण नातेवाइकाला अतीदक्षता विभागात भरती करण्यात येणे आणि ती अकस्मात् चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने तिच्या वडिलांनी तिच्यासाठी सद्गुरु गाडगीळ यांनी सांगितलेला जप करणे : १.१२.२०२१ या दिवशी दुपारी तिच्या आईने मला सांगितले, ‘‘तिला अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे’’; म्हणून मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना नामजप विचारला. त्यांनी ‘निर्गुण’ हा जप ३ घंटे करायला सांगितला. प.पू. दास महाराज यांनीही मंत्र सांगितला आणि मंत्र लिहिलेला कागद तिच्या जवळ ठेवायला सांगितला. हे उपाय सांगण्यासाठी मी तिच्या वडिलांना संपर्क केला. तेव्हा ती उभी असतांना अकस्मात् चक्कर येऊन बेशुद्ध पडली; म्हणून तिच्या वडिलांनी तिच्यासाठी नामजप करणे चालू केले.
(क्रमशः)
– एक साधिका

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/787559.html