पाकिस्ताकडून खराब तांदळाचा पुरवठा; रशियाकडून आयात बंद करण्याची चेतावणी !

मॉस्को – पाकिस्तानातून येणार्‍या तांदळावर बंदी घालणार असल्याची चेतावणी  रशियाने पाकिस्तानला दिली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या तांदळामध्ये जंतू सापडले आहेत. त्यामुळे पूर्ण काळजी आणि पुन्हा अशा प्रकारे तांदूळ पाठवल्यास त्यावर बंदी घालण्यात येईल, असे रशियाने म्हटले आहे.

१. रशियाच्या ‘फेडरल एजन्सी वेटरनरी अँड फायटोसॅनिटरी सर्व्हिलन्स’ला पाकिस्तानातून येणारा तांदूळ खराब असल्याचे आढळले आणि त्यांनी याविषयी अधिसूचनाही प्रसारित केली होती.

२. रशियाने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. रशियाने पाकिस्तानच्या व्यापार प्रतिनिधीकडे अप्रसन्नता व्यक्त करत या प्रकरणाचे अन्वेषण करण्याची मागणी केली आहे.

३. वर्ष २०१९ मध्येही रशियाने आरोग्याच्या कारणास्तव पाकिस्तानातून येणार्‍या तांदूळावर बंदी घातली होती.

४. भारताने बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने पाकिस्तानला लाभ झाला आहे. जगभरात विकला जाणारा ४० टक्के तांदूळ भारत निर्यात करतो.

संपादकीय भूमिका 

स्वतः भीकेला लागलेला पाक अन्य देशांना धान्याची निर्यात करतो, हाच मोठा विनोद !