Ukraine Attacks Russia : युक्रेनकडून रशियावर ड्रोनद्वारे आक्रमण : २ जण ठार

मॉस्को (रशिया) – युक्रेनच्या सैन्याने २० एप्रिलच्या रात्री रशियाच्या ८ भागांत ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणात ३ वीज उपकेंद्र आणि इंधन डेपो यांना आग लागली. तसेच २ जणांचा मृत्यू झाला. याच वेळी रशियाच्या संरक्षण यंत्रणेने युक्रेनचे ५० ड्रोन पाडले.

गेल्या काही महिन्यांत युक्रेनने रशियाचे तेल शुद्धीकरण कारखाने, टर्मिनल्स, तसेच ऊर्जा पायाभूत सुविधांवर आक्रमणे केली आहेत. रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी युक्रेन अशी आक्रमणे करत असल्याचे म्हटले जात आहे. याआधी मार्चमध्येही युक्रेनने रशियाच्या ३ तेल शुद्धीकरण कारखान्यांना लक्ष्य केले होते.