वृंदावनाच्या २० किमी परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

बागेश्‍वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

वृंदावन – मथुरा येथील श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाचा प्रश्‍न अयोध्येप्रमाणे कोणताही वाद आणि गडबड न होता सोडवला जाईल. जसे भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान झाले, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णही मथुरेत विराजमान होतील. हा देश रघुवराचा असल्याने बाबरचे वंशज बांधील आहेत. वृंदावनच्या २० कि.मी. परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे, असे विधान बागेश्‍वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले.

वृंदावन येथे आध्यात्मिक गुरू डॉ. अनुराग कृष्ण पाठक यांच्याशी चर्चा

पंडित धीरेंद्रकृष्ण शात्री हे संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावन येथे गेले होते. त्यांनी वृंदावनात बालाजी मंदिराचे अध्यात्मिक गुरू डॉ. अनुराग कृष्ण पाठक यांच्याशी अध्यात्मावर चर्चा केली. धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे स्वागत नगरसेवक राधाकृष्ण पाठक, संत हेमकांत शरण आदींनी केले.