रायबरेली (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील मंताशा नावाच्या मुसलमान तरुणीने आशिष मौर्य नावाच्या हिंदु तरुणाशी विवाह केला. मंताशा आता मानसी मौर्य म्हणून ओळखली जाणार आहे. जिल्ह्यातील एका मंदिरात वैदिक परंपरेनुसार दोघांचा विवाह झाला.
Mu$l!m girl ties the knot with a Hindu boy in Uttar Pradesh's Raebareli !#SanatanaDharma #MantashaTurnsMansi #Gharwapsi pic.twitter.com/G29vxjU6uI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 29, 2024
१. मंताशाने सांगितले, ‘मला पूर्वीपासून इस्लाम धर्म आवडत नव्हता. मला हिंदु धर्म आवडत होता. अशा परिस्थितीत जेव्हा माझी ओळख झाली, तेव्हा मला हिंदु धर्म समजून घेण्याची संधी मिळाली.’
२. आशिष मौर्यसोबत लग्न करण्यासाठी मंताशाने घरच्यांना समजवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण काही उपयोग झाला नाही. २५ फेब्रुवारी या दिवशी मंताशा घर सोडण्यात यशस्वी झाली. आशिष मौर्य आणि मंतशा दोघेही रायबरेलीतील बेनी माधव हनुमान मंदिरात पोचले. तेथे त्यांनी वैदिक परंपरेनुसार विवाह केला.