उज्जैन (मध्यप्रदेश) – जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे उद्घाटन १ मार्च या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथे होणार आहे. हे घड्याळ पूर्णपणे डिजिटल आहे. घड्याळात ४८ मिनिटांचा एक घंटा (तास) असेल. या घड्याळात मुहूर्त, ग्रहण दिनांक, सण, व्रत, शुभ मुहूर्त, ग्रह-भद्रा स्थिती, सूर्य-चंद्रग्रहण आणि सण-उत्सवही वेळेच्या हिशोबाने दाखवले जाणार आहेत.
सौजन्य News18 MP Chhattisgarh
१. हे घड्याळ उज्जैनमधील जंतरमंतरजवळ ८५ फूट उंच टॉवरवर बसवण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी या दिवशी टॉवरच्या पाचव्या मजल्यावर घड्याळ बसवले आहे. ते पूर्णपणे इंटरनेटशी जोडलेले आहे.
२. हे घड्याळ देहली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवले आहे. या वैदिक घड्याळात ऋग्वेदानुसार हिंदु गणना आणि ग्रीनविच वेळ प्रणाली याद्वारे एकाच वेळी वेळ पहाता येणार आहे. यात ३० घंटे, ३० मिनिटे आणि ३० सेकंदांची वेळ दर्शवली जाईल.
३. या घड्याळात सूर्योदयाची वेळ, शुभ काळ, विक्रम संवत दिनदर्शिका, मुहूर्त कालावधी, राहू कालावधी आणि पंचांग यासह वेगवेगळ्या वेळेनुसार ३ वेगवेगळ्या वेळेची गणना करता येते.
PM Modi to inaugrate world's first Vedic clock in Ujjain on March 1 !#MadhyaPradesh #PMModi pic.twitter.com/rJErEy15hm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 27, 2024
४. ‘राजा विक्रमादित्य संशोधन संस्थे’चे संचालक डॉ. श्रीराम तिवारी म्हणाले की, उज्जैनचा प्राचीन वैभवशाली वारसा परत आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. उज्जैननंतर देशाच्या इतर भागातही हे घड्याळ बसवण्याची योजना आहे.
५. घड्याळ बसवण्याचे काम करणारे सुशील गुप्ता म्हणाले की, या घड्याळात सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत ३० घंट्यांचा वेळ असेल. ही आपली भारतीय प्रमाणवेळ आहे. यानुसार ४८ मिनिटांचा एक घंटा असतो. भारतीय दिनदर्शिकेच्या गणनेवर आधारित हे घड्याळ आहे.
६. उज्जैन शहर कर्कवृत्त रेषेच्या उष्ण कटिबंधावर वसलेले आहे. ही रेषा एकेेकाळी शहराच्या मध्यभागी होती. या कारणास्तव येथे कर्कराज मंदिर आहे. सम्राट विक्रमादित्य यांच्या नवरत्नांपैकी एक आचार्य वराहमिहीर यांनी काळाची गणना करण्यात मोठे योगदान दिले आहे. वराहमिहिर हे त्यांच्या ज्योतिषीय गणनेद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या भविष्याविषयी अचूक माहिती देत असत. पुढे राजा जयसिंग यांनी देशातील ४ वेधशाळांपैकी एक येथे स्थापन केली.
७. वैदिक घड्याळाचा अॅपही विकसित करण्यात आला आहे. वापरकर्ते हिंदु पंचांग, मुहूर्त, ग्रहांची स्थिती, सूर्य आणि चंद्र स्थितींद्वारे ज्योतिषीय गणनांसह हिंदु दिनदर्शिकेशी संबंधित सर्व काही पाहू शकतात. या घड्याळात तिथी, पक्ष (चंद्र पंधरवडा) या चंद्राच्या स्थितीवरून दिवस मोजले जातील. हे घड्याळ ‘ग्रीनविच मीन टाइम’ (GMT) नुसार वेळदेखील प्रदर्शित करेल. हे घड्याळ भारतातील सर्व प्रमुख मंदिरांशी जोडले जाईल.