PM Modi : अश्वमेध महायज्ञ सामाजिक संकल्पाची एक मोठी मोहीम ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी मुंबई, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – अश्वमेध महायज्ञ सामाजिक संकल्पाची एक मोठी मोहीम आहे. हे सामाजिक संकल्पाचे मोठे अभियान आहे. यज्ञाच्या माध्यमातून युवकांना व्यसनमुक्ती आणि व्यसनमुक्तीसाठी जी हाक देण्यात आली आहे, ती युवकांना त्यापासून अलिप्त करून राष्ट्रउभारणीला साहाय्य करील. अश्वमेध महायज्ञातून तरुणांच्या चारित्र्यावर घेतलेली प्रतिज्ञा राष्ट्राच्या उभारणीसाठी आहे. अमृत काळामध्ये राष्ट्रउभारणीचे दायित्व तरुणांवर आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी अखिल जागतिक गायत्री परिवाराच्या मुंबई अश्वमेध महायज्ञाला दिलेल्या ऑनलाईन संदेशात म्हटले आहे.

भारताचे नवे चित्र जगासमोर उभे करण्याच्या संकल्पाने गायत्री परिवाराच्या पाच दिवसीय मुंबई अश्वमेध महायज्ञाची सांगता पूर्णाहुतीने झाली. या वेळी लाखो लोकांनी आहुती दिल्या. महिला सक्षमीकरण आणि अमली पदार्थमुक्त भारताची शपथ घेतली.

२५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी महायज्ञाच्या शेवटच्या दिवशी पूर्णाहुती निमित्त अश्वमेध नगरीत भाविकांनी मोठी गर्दी झाली होती. ५ दिवसीय अश्वमेध महायज्ञात प्रतिदिन साडेपाच लाखांहून अधिक आहुती देण्यात आल्या.