काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्रही नको; कारण…

‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अंदमानात असल्यापासून त्यांच्याशी, म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानाशी गांधी यांच्या काँग्रेसने उभा दावा मांडला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे मोठे बंधू बाबाराव दोघेही ६ मासांच्या अंतराने जन्मठेप भोगण्यासाठी अंदमानात गेले. त्यांची सुटका होण्यासाठी काँग्रेसने ४ ओळीचे निवेदनही इंग्रजांकडे पाठवले नाही. जिवंत असतांनाही काँग्रेसने त्यांना सुखाने जगू दिले नाही आणि मृत्यूनंतरही अंदमानातील क्रांतीस्तंभावरील काव्यपंक्ती काँग्रेसने खरडून टाकल्या. आता तर त्यांचे चित्रही त्यांना डोळ्यांसमोर नको आहे; कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर देशभक्ती आणि जाज्वल्य हिंदुत्व ! या दोन्हीही गोष्टींना काँग्रेसच्या कुंडलीत स्थान नाही.

१. मोपल्यांचे बंड आणि हिंदूंची वृत्ती

लोकमान्य टिळक यांच्या निर्वाणानंतर काँग्रेस पूर्णतः मुसलमानधार्जिणी झाली. नुसती मुसलमानधार्जिणीच नव्हे, तर मुसलमान हिंदूंवर अत्याचार करायला लागले, तर त्याकडे दुर्लक्ष करण्यातच तिला गोडी लागली. ऑगस्ट १९२१ या मासापासून मलबारमधील (केरळ) मोपल्यांनी काँग्रेसच्या खिलाफत चळवळीमुळे गाफील राहिलेल्या हिंदूंवर भयानक आक्रमणे केली. सहस्रो हिंदूंची कत्तल झाली. सहस्रावधी हिंदु स्त्रियांवर भरदिवसा बलात्कार करण्यात आले. सहस्रो घरे अनेक दिवस जळत होती. किती सहस्र हिंदूंची सुंता करण्यात आली, याची तर गणतीच नाही. हिंदु-मुसलमान ऐक्याच्या खोट्या कल्पनेने हिंदू प्रतिकारहीन झाले होते. मुसलमानांच्या उद्दामपणाला उत्तर देणारे टिळक आता अस्तंगत झाले होते. हे अत्याचार ४ मास चालू होते. यावर काँग्रेस आणि गांधी यांनी ‘मोपले त्यांच्या धर्माप्रमाणे वागले. मोपले शूर आहेत’, असे म्हणून हिंदूंकडे दुर्लक्ष केले. बाळकृष्ण मुंजे, पंडित मदन मोहन मालवीय, स्वामी श्रद्धानंद या पुढार्‍यांनी मलबारमधील मुसलमानांच्या या नीच कृत्याकडे सार्‍या देशाचे लक्ष वेधले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या घटनांचे वर्णन करणारे ‘मला काय त्याचे अर्थात् मोपल्यांचे बंड’ हे पुस्तक लिहिले. हे शीर्षकच पुढे वाक्प्रचार म्हणून मराठीत अजरामर झाले. धर्मबंधुत्व विसरलेल्या हिंदूंच्या वृत्तीवर सावरकर यांनी या पुस्तकाद्वारे नेमके बोट ठेवले. मोपला प्रकरणे परत परत घडत आहेत, हिंदूंनी त्याकडे डोळेझाक करावी; म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर काँग्रेसला नकोत !

२. सावरकर यांच्या सुटकेचे प्रयत्न काँग्रेसने टाळले !

अंदमानात तेलाच्या घाण्याला बैलासारखे जुंपून घेऊन प्रतिदिन ५० ते ६० पौंड तेल (अनुमाने २२ लिटर) गाळून १० वर्षांची शिक्षा भोगल्यावर सावरकर यांना वर्ष १९२४ मध्ये हिंदुस्थानात आणण्यात आले. त्यांच्या प्रखर देशभक्तीमुळे इंग्रजांनी त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात ५ वर्षांसाठी स्थानबद्ध केले. हा कालावधी इंग्रजांनी वर्ष १९३७ पर्यंत वाढवत नेला. वर्ष १९३७ मध्ये मुंबई प्रांतासहित अनेक ठिकाणी काँग्रेसची मंत्रीमंडळे स्थापन झाली; मात्र काँग्रेसच्या या मंत्रीमंडळाला ‘सावरकर यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करावी’, असे वाटले नाही. काँग्रेसच्या मंत्रीमंडळाने त्यागपत्र दिल्यावर बॅरिस्टर जमनादास कपूर यांच्या मंत्रीमंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुटका केली. ही सुटका आधीच करण्यात आली असती, तर बॅरिस्टर जीना माजले नसते. या मग्रूर बॅरिस्टरशी झुंजण्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यतिरिक्त दुसरा योग्य ‘बॅरिस्टर’च नव्हता.

३. सावरकर यांच्या साहित्यातून लढाऊ वृत्ती जागी होणे

श्री. संजय मुळ्ये

काही वर्षांपूर्वी एका नराधम सासर्‍याने ५ मुले असलेल्या त्याच्या सुनेवर बलात्कार केला. देशाचे तत्कालीन काँग्रेसी पंतप्रधान त्यावर कडक प्रतिक्रिया देऊ शकले नाहीत. त्यांच्या कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे केवळ छायाचित्र जरी असते, तरी त्याकडे पाहूनच त्या सासर्‍याला आणि ‘आपल्या नवर्‍याला मुलगा मान’, असे सांगणार्‍या उलेमानांना (इस्लाम धर्माविषयीचा ज्ञानी) कडक शिक्षा देण्याची आज्ञा करण्याचे धाडस त्या काँग्रेसी पंतप्रधानाला झाले असते !

या पार्श्वभूमीवर एक प्रसंग आठवतो. आचार्य प्र.के. अत्रे आणि ना.सी. फडके यांची साहित्य सेवा सर्वश्रुत आहे. आचार्य अत्रे यांना एकदा विचारण्यात आले की, फडके यांच्या साहित्यात स्त्री-पुरुष संबंधाचे वर्णन आहे, तसे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्यातही आहे. मग या दोघांच्यात काय भेद आहे ? (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘काळे पाणी’, ‘मला काय त्याचे’, या पुस्तकात मुसलमान गुंडांनी हिंदु स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांची माहिती आहे.) अत्रे त्यावर ताडकन् उत्तरले, ‘फडक्यांची वर्णने वाचून बलात्कार करावासा वाटतो, तर स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य वाचून बलात्कार्‍याचे लिंग छाटावेसे वाटते !’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य वाचणे दूरच राहिले, काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सावलीही आपल्या अंगावर पडू द्यायची नाही; कारण हा देश, ही भूमी, येथील मंदिरे आणि येथील बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजावर बलात्कार करणार्‍यांमध्ये काँग्रेसला आवडणार्‍या दोन अल्पसंख्यांक समाजांचाच भरणा अधिक आहे, ते समाज रागावतील ना !

४. काँग्रेसवाल्यांनो कुठे फेडणार हे पाप ?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘जयोऽस्तुते श्री महन्मंगले…..’ हे अजरामर गीत आकाशवाणीवर लागायला स्वातंत्र्यानंतर १६ वर्षे जावी लागली. हे एकच गीत लिहून स्वातंत्र्यवीर सावरकर थांबले असते, तरी राष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले असते; पण गीतकाराच्या द्वेषामुळे त्या गीताचीच महती काँग्रेसने गुंडाळून ठेवली. आजही स्वातंत्र्याच्या वेळेस १० वर्षांचे असणार्‍या तथाकथित स्वातंत्र्य सैनिकांना ‘निवृत्तीवेतन’ मिळत आहे; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हे निवृत्तीवेतन मिळायला आयुष्याची सायंकाळ पहायला लागली.

अंदमानात असणार्‍या स्मारकावरील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्यपंक्ती काढणारे तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांच्या प्रतिकृतीला शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी चपलेने मारले होते. हीच शिक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आणि त्यांच्या हिंदुत्वाचा द्वेष करणार्‍या काँग्रेसलाही द्यायला हवी; पण तो चपलेचा अपमान ठरणार नाही ना ?’

– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी

(साभार : ‘स्वातंत्र्यवीर’, जानेवारी २००६)

संपादकीय भूमिका 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हिंदुत्वाचा सातत्याने द्वेष करणार्‍या काँग्रेसला हिंदूंनी मतपेटीतून तिची जागा दाखवून द्यायला हवी !

काँग्रेसचा नीचपणा आजचाच नव्हे !

स्वातंत्र्यवीर सावरकर, म्हणजे एक व्यक्ती नव्हे किंवा काँग्रेससारखी दिखाऊ देशभक्तांचा भरणा असलेली ती एक संस्था नव्हे, ती एक ज्वाला आहे. जिला भ्रष्टाचार, ढोंग, देशद्रोह, सद्गुणविकृती आणि बोलल्याप्रमाणे न वागणे इत्यादींचा स्पर्शच झाला नाही. काँग्रेसने ब्रिटिशांशी संगनमत करून सावरकर यांना त्रास देण्याचे अनेक प्रयत्न केले. सावरकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांना सुखाने जगू दिले नाही. दुसर्‍या महायुद्धात सैनिक भरतीसाठी हिंदूंना प्रोत्साहन देणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेसने ‘ब्रिटिशांचे ‘एजंट’ (दलाल), रिक्रुटवीर (भरतीवीर)’, असे म्हटले. दुसरे महायुद्ध चालू झाल्यानंतर सावरकर यांच्या प्रयत्नाने २ ते ३ वर्षांत ४ ते ५ लाख हिंदु तरुण सैन्यात भरती झाले. तत्पूर्वी ब्रिटिशांच्या सैन्यात मुसलमान आणि हिंदूंचे प्रमाण अनुक्रमे ६५ अन् ३५ टक्के असे होते. सावरकर यांच्या प्रयत्नाने ते प्रमाण अनुक्रमे ३५ आणि ६५ टक्के असे झाले. यामुळे भारत स्वतंत्र झाल्यावर लगोलग घडलेले पाकिस्तानचे आक्रमण थोपवायला भारताला हिंदु सैनिक तरी मिळाले. सावरकर यांचे हे उपकार विसरून काँग्रेसने गांधी हत्येच्या आरोपाखाली त्यांना एक वर्षाहून अधिक काळ कारावासात ठेवले. गांधी हत्येतून उच्च न्यायालयाने सावरकर यांची निष्कलंक मुक्तता केली. हे अल्प (कमी) झाले; म्हणून की, काय पुन्हा एकदा वर्ष १९५० मध्ये नेहरू आणि पाकचे पंतप्रधान लियाकत अली यांच्या भेटीच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेसने १०० दिवस बेळगावच्या तुरुंगात डांबले. ही भेट होती देहलीत आणि ६८ वर्षांचे आजारी सावरकर मुंबईत होते. ही मस्कुटदाबी सावरकर यांची नव्हती, तर सर्व हिंदूंचीच होती.

– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी