हिंदुद्वेष्ट्या नेहरू-गांधी कुटुंबियांनी भारतभूमीचे केलेले विभाजन आणि दान !

१८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘केवळ गांधींना ‘सरदार पटेल नको’ असल्याने त्यांचे बहुमत डावलून त्यांनी नेहरूंना पंतप्रधान बनवणे, अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेले नेहरू, चीनला साहाय्य करून तिबेट गिळंकृत करून देणारे नेहरू, नेहरूंची चीनप्रेमाची परंपरा त्यांच्या वंशजांकडूनही पुढे चालवली जाणे’, याविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/765904.html

१०. चीन भारतीय सैनिकांना ठार मारत असतांना चिनी दूतावासात जाऊन भेटणारे भारतद्वेष्टे राहुल गांधी !

चीन आणि भारत यांच्यामध्ये २ वर्षांपूर्वी डोकलाम येथे एक चकमक उडाली होती. दोन्ही देशाच्या सैनिकांनी एकमेकांवर शारीरिक आक्रमण केले होते. या आक्रमणात अनेक चिनी सैनिक, तर भारताचे २० सैनिक मारले गेले होते. याच चकमकीच्या वेळी राहुल गांधी यांनी भारतातील चिनी दूतावासात गुपचूपपणे जाऊन चीनचा पाहुणचार स्वीकारला होता. काँग्रेस पक्षाकडून ही भेट गुप्त राखण्याचा आटोकाट प्रयत्न झाला होता; पण चीननेच प्रकाशित केलेल्या एका छायाचित्रावरून ही घटना उघडकीस आली. एकीकडे चीनचे सैनिक भारतीय सैनिकांना ठार करत असतांना दुसरीकडे मात्र राहुल गांधी यांनी शत्रूराष्ट्राचा पाहुणचार स्वीकारावा, हे केवढे संतापजनक आहे !

११. ‘भारत बलशाली होऊ नये’, या चीनच्या षड्यंत्राला नेहरूंनी फसून त्याला प्रदेश दान केले !

नेहरू आणि त्यांचे वंशज भारताच्या भूभागाचे जेवढे दान करता येईल तेवढे करत गेले. त्यांनी महंमद अली जीना यांना पाकिस्तानचा, तर शेख अब्दुल्ला यांना काश्मीरचा भूभाग दान केला. दक्षिण आशियाच्या रणनीतीच्या क्षेत्रामधील एक महत्त्वाचे ‘कोको’ नावाचे बेट (द्वीप) त्रिपक्षीय (भारत, ब्रिटन आणि ब्रह्मदेश) कराराप्रमाणे १९५० मध्ये ब्रह्मदेशाला दान केले. भारत भविष्यात सामरिकदृष्ट्या बलशाही होऊ नये, या ब्रिटिशांच्या कारस्थानाला पंडित नेहरू फसले. पुढे हेच द्वीप ब्रह्मदेशाने चीनला दान केले. आज या द्वीपावर चीनचे मोठे नाविक दल आहे, जे भारताच्या सुरक्षेला धोकादायक आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जवळपास ५ सहस्र चौरस किलोमीटर भूप्रदेश पाकिस्तानने चीनला दान केला. तेथे आता चीनने पक्के बांधकाम करून त्यांच्या लष्करी छावण्या उभारल्या आहेत. हेही भारताच्या सुरक्षेला अत्यंत धोकादायक आहे.

१२. नेहरूंकडून धूर्त आणि विस्तारवादी चीनला आत्मसन्मानासह सर्व काही दान !

श्री. शंकर गो. पांडे

नेहरूंनी वर्ष १९५१ मध्ये अमेरिकेने देऊ केलेले सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व आणि त्यासमवेतच मिळणारा ‘व्हेटो’चा (विशेष अधिकार) शक्तीशाली अधिकार नाकारून त्याचे दान उदार अंतःकरणाने चीनच्या पदरात टाकले. वर्ष १९५२ मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले. त्या वेळेस त्यांचा कोणताही प्रतिकार न करता उलट चीनला साहाय्य करून, त्याला तिबेटचा घास गिळंकृत करू दिला आणि भारतियांना पुष्कळ प्राचीन काळापासून पवित्र असणारे कैलास पर्वत आणि मानस सरोवर ही तीर्थस्थळे कायमची गमावली. आज या तीर्थस्थळांचे दर्शन घ्यायचे असेल, तर भारतियांना चीनची अनुमती आणि साहाय्य घ्यावे लागते. (भारत आता तिथे चीनची अनुमती न घेता जाता येण्यासाठी रस्ता सिद्ध करत आहे. – संकलक) चीनचा विस्तारवादी आणि क्रूर स्वभाव लक्षात न घेता  नेहरू चीनच्या पदरात ‘पंचशील करारा’चा जप करत त्याला हवे ते दान देत राहिले.

१३. सैनिकीकरणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करणार्‍या नेहरूंनी लडाखमधील सहस्रो चौरस किलोमीटर भूमी दान करणे

पंडित नेहरूंनी आरंभीपासूनच भारताच्या सैनिकीकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. मुळात त्यांना भारताचे सैन्यदल विसर्जित करायचे होते. धूर्त आणि कावेबाज चीनला जेव्हा नेहरूंचा भोंगळ स्वभाव लक्षात आला, तेव्हा त्याने वर्ष १९६२ मध्ये भारतावर सरळ आक्रमण केले. चीनने भारतावर सैनिकी आक्रमण केले, तेव्हा भारतीय सैनिकांजवळ पायात घालायचे साधे बूटही नव्हते, तर मग आधुनिक आणि पुरेशी शस्त्रसामुग्री, दारूगोळा, दळणवळण करण्यासाठी मजबूत रस्ते या तर पुष्कळ दूरच्या सोयी-सवलती होत्या. परिणामतः चीनने लडाखमधील ३५ सहस्र चौरस किलोमीटरचा भूभाग सहजासहजी त्याच्या घशात घातला; परंतु भारताची एवढी नामुष्की होऊन आणि भारताचा एवढा भूभाग गमावूनही नेहरूंना याविषयी जराही दुःख नव्हते. भारताच्या या पराभवाविषयी विरोधी पक्षांकडून संसदेत जेव्हा जाब विचारण्यात आला, तेव्हा पंडित नेहरू म्हणाले, ‘‘चीनने भारताचा जो भूभाग बळकावला आहे तो भारताच्या काहीच कामाचा नाही; कारण त्यावर गवताचे पातेही उगवत नाही !’’ एकंदरीत पंडित नेहरूंनी भारताच्या लडाखमधील सहस्रो चौरस किलोमीटर भूभागाचे दान चीनच्या पदरातच टाकले होते, असे म्हणायला मुळीच हरकत नाही.

१४. इंदिरा गांधींनी कछुवा बेट श्रीलंकेला दान केले !

भारताच्या भूभागाचे दान करण्याची पंडित नेहरू यांची परंपरा त्यांच्या हिंदुद्वेष्ट्या वारसदारांनी पुढेही चालू ठेवली आहे. वर्ष १९७४ मध्ये भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी कछुवा नावाचे बेट श्रीलंकेला दान केले. रामेश्वरम् आणि श्रीलंका यांच्यामधील हिंद महासागरातील १६३ एकर क्षेत्रफळ असणार्‍या या बेटावर तमिळनाडूचे मासेमार मासेमारीसाठी जाऊ शकत होते; पण तेथे श्रीलंका सरकारने त्याचे नाविक दल स्थापन केल्यापासून भारतीय मासेमारांना या बेटावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. आता हे बेट म्हणजे भारतीय आणि श्रीलंका यांच्या मासेमारांचे युद्धमैदान झाले आहे. नुकतीच तमिळनाडूच्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ‘हे बेट भारताने परत आपल्या कह्यात घ्यावे’, अशी मागणी केली आहे.

१५. काँग्रेसचे मनमोहनसिंह यांनी बांगलादेशी घुसखोरांना घुसखोरी सुलभ होण्यासाठी सोय करणे !

भारताचा भूभाग दान करण्यात भारतातील हिंदुद्वेष्ट्या नेत्यांचे हात जगातील कोणताही अन्य देश धरू शकत नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ८५ मीटर रुंद आणि १७८ मीटर लांब असा एक ‘तीन बिघा जमीन’ या नावाने ओळखल्या जाणारा भूमीचा तुकडा आहे. ही भूमी सष्टेंबर २०११ पर्यंत भारताच्या कह्यात होती; पण सष्टेंबर २०११ मध्ये डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारने ती बांगलादेशाला ९९ वर्षांच्या करारावर दान केली. कशासाठी, तर बांगलादेशातील मुसलमानांना भारतात येणे-जाणे सोपे व्हावे यासाठी ! बांगलादेशातून भारतात घुसलेल्या कोट्यवधी घुसखोरांना बाहेर काढणे तर दूरच; उलट हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी त्यांचा भारतात घुसण्याचा मार्ग सुलभ करावा, हे केवढे संतापजनक आहे ! ‘तीन बिघा भूमी’चे दान बांगलादेशाला ९९ वर्र्षांच्या कराराप्रमाणे केले असले, तरी ही भूमी आता भारताला परत मिळणे अशक्यच वाटते !

१६. अमेरिकेने साम, दाम, दंड, भेद करून क्षेत्रफळ वाढवणे

भारताच्या असे सातत्याने खंडित होण्याच्या पार्श्वभूमीवर मला अमेरिकेच्या विस्तारवादी भूमिकेच्या उदाहरणाचे स्मरण होते. मला अमेरिकेत ऑक्टोबर २०१० आणि ऑगस्ट २०२३ असे २ वेळा जाऊन तेथे अनेक मास वास्तव्य करण्याचा योग आला. त्या वेळी अमेरिकेचा इतिहास वाचतांना असे लक्षात आले की, वर्ष १७८३ पर्यंत उत्तर अमेरिकेतील १३ वसाहतींनी एकत्र येऊन बनवलेली अमेरिका हीच मूळ अमेरिका होती. पुढे उत्तर अमेरिकेतील १३ राज्ये आणि दक्षिण अमेरिकेतील २० वसाहती (राज्ये) एकत्र येऊन अमेरिकेचा मोठा विस्तार झाला; पण एवढ्यावरच अमेरिकेच्या राज्यकर्त्यांनी समाधान न मानता आपल्या देशाचा विस्तार वाढवत नेला. अमेरिकेने आजूबाजूच्या स्पेन, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, मेक्सिको या देशांचा पुष्कळसा भूप्रदेश साम, दाम, दंड आणि भेद या मार्गांचा अवलंब करून आपल्या अधिपत्याखाली घेतला. आता अमेरिकेच्या घटक राज्यांची संख्या ५० असून काही बेटेही अमेरिकेच्या कह्यात आहेत. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने आज अमेरिका जगात चौथ्या क्रमांकावर असून तिचे क्षेत्रफळ भारताच्या तीन पट, म्हणजे ९३ लाख ७३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे आहे.

१७. ब्रिटिशांनी भारत शक्तीमान न होण्यासाठी त्याचे अनेक तुकडे करणे आणि त्यांच्या कावेबाजपणाला नेहरूंनी भुलणे !

पूर्वी भारताचे क्षेत्रफळही अवाढव्य होते; म्हणून भारताला ‘भरतखंड’ म्हटले जात असे; पण भारत असाच अखंड राहिला, तर तो जगात सर्वांत शक्तीमान देश होईल; म्हणून इंग्रजांनी हळूहळू भारतापासून एकेक भूभाग वेगळा करणे चालू केले. आपल्या सत्तारूढ शासनकर्त्यातील दूरदृष्टीच्या अभावामुळे ते ब्रिटिशांच्या कावेवाजपणाला फसले. वर्ष १८७६ मध्ये अफगाणिस्तान (गांधार), वर्ष १९०४ मध्ये नेपाळ, वर्ष १९०६ मध्ये भूतान, वर्ष १९१४ मध्ये तिबेट (त्रिविष्टप), वर्ष १९३७ मध्ये ब्रह्मदेश (म्यानमार), वर्ष १९३९ मध्ये श्रीलंका (सिलोन) हे भूप्रदेश भारतापासून स्वतंत्र झाले. यानंतर वर्ष १९४७ पासून भारताच्या विभाजनाचा आणि हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांमुळे भारताचा भूभाग गमावण्याचा आणि दान करण्याचा इतिहास सर्वांना ज्ञात आहेच.

१८. भारताचे एवढे तुकडे होऊनही समाधानी नसलेले भारतद्वेष्टे देशाचे आणखी तुकडे करण्यासाठी प्रयत्नरत !

भारताचे एवढे विभाजन होऊनही हिंदुद्वेष्ट्यांचे अद्यापही समाधान झाले नाही. त्यामुळे ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा घोषणा आजही उघडपणे दिल्या जातात आणि अशा देशद्रोही घोषणा देणार्‍यांना हिंदुद्वेष्ट्या पक्षाकडून आपल्या पक्षात सन्मानाने प्रवेश देऊन पदेही दिली जातात. नक्षलवादी भारतात तमिळनाडूपासून नेपाळपर्यंत एक ‘रेड कॉरिडॉर’ (साम्यवादी राज्य असलेला मार्ग) बनवू इच्छितात. खलिस्तानवाद्यांना पंजाबला भारतापासून तोडून शिखांसाठी स्वतंत्र अशा ‘खलिस्तान’ची निर्मिती करायची आहे. पूर्वाेत्तर राज्यातील ख्रिस्तीबहुल राज्यांना भारतापासून तोडण्यासाठी षड्यंत्र रचले गेले असून यासाठी चीनचेही साहाय्य घेतले जात आहे. नागा जमातीला ‘नागालँड’ स्वतंत्र हवे आहे. घुसखोरी आणि आपली लोकसंख्या वाढवून मुसलमानांना वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे. याला अनेक हिंदुद्वेष्टे राजकीय नेते आणि पक्ष यांचा पाठिंबा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्षे सत्तास्थानी हिंदुद्वेष्टे शासनकर्तेच निवडून आल्यामुळे भारत असा सारखा खंडित होत आला. हिंदु समाज अजूनही जागा होऊन संघटित होत नसेल, तर पुढचा काळ त्याच्यासाठी पुष्कळ भयानक असेल, हे भविष्य वर्तवण्यासाठी कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही !

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.

हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांमुळे भारताचा जो जो भूभाग गमावला आहे, तो भाग आताच्या केंद्र सरकारने परत मिळवावा ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !