श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या साधनेच्या प्रवासाची छायाचित्रे पहातांना डोळे मिटले जाऊन ‘निर्विचार’ हा नामजप गतीने चालू होणे आणि आज्ञाचक्रावर दैवी स्पंदने जाणवणे

आधुनिक वैद्य अशोक तांबेकर

‘२४.१२.२०२३ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत असतांना पृष्ठ क्र. ५ वर दाखवलेला साधनेचा प्रवास, यात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा आध्यात्मिक पातळीनुसार होत गेलेला प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवला आहे. त्यातील श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झालेल्या वेळेचे छायाचित्र पहात शेवटच्या छायाचित्रापर्यंत म्हणजे महर्षींनी त्यांना ‘श्रीचित्‌शक्ति’ असे घोषित केल्याच्या वेळचे छायाचित्र पहातांना माझे डोळे आपोआप मिटले गेले आणि माझा ‘निर्विचार’ हा नामजप गतीने चालू झाला. तसेच माझ्या आज्ञाचक्रावर दैवी स्पंदने बराच वेळ जाणवत होती. श्रीगुरुचरणी अर्पण !’

– आधुनिक वैद्य अशोक तांबेकर (वय ६९ वर्षे), पनवेल.

(२४.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक