नवी मुंबईतून बेपत्ता झालेल्या ५ मुलींचा ‘अरिफ’च्या संपर्कानंतर शोध !

नवी मुंबई – तळोजा येथील २ कुटुंबातील ५ ते १६ या वयोगटातील ५ मुली घर सोडून गेल्या होत्या. नवी मुंबईच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या मुलींचा शोध घेऊन देहलीतील गुडगाव येथून त्यांना कह्यात घेतले. यांपैकी एका मुलीचा मानलेला भाऊ ‘अरिफ’ याच्याशी संपर्क साधल्यानंतर या मुलींचा शोध पोलिसांनी लावला आहे.

सौजन्य वादळवरा लाईव 

या मुली एकमेकांसमवेत होत्या. त्यांचे अपहरण झाले कि त्यांना फसवून पळून येण्यास भाग पाडण्यात आले, हे पोलिसांनी स्पष्ट सांगितलेले नाही. यांपैकी तिघी एका आणि दोघी अन्य कुटुंबातील असून त्या बहिणी आहेत. ‘आई-वडिलांवर रागवून त्या घरातून पळाल्या होत्या’, असे त्यांनी सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका 

  • मुली कुठे गेल्या हे धर्मांधांना कसे ठाऊक असते ? यावरूनच मुलींना खरा धोका कुणापासून आहे, हे वेगळे सांगायला नको !
  • या मुलींचे काय करण्यात येणार होते ? याच्या मुळाशी जाऊन पोलीस संबंधितांवर कारवाई करणार का ?