आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा पाया दृढ होत असलेली चिन्हे !

‘आयटी इंडस्ट्री’ (माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र) जशी वाढत जाईल तसे आरोग्याविषयी आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा पाया दृढ होत जाणार आहे. रुग्णांमधील प्रतिदिनच्या अनुभवांवरून लक्षात येते की,

वैद्य परीक्षित शेवडे

१. ‘आयटी’मधील मंडळी जागतिक संशोधन किंवा एकूणच आरोग्य स्थितीविषयी बर्‍यापैकी अद्ययावत् असतात.

२. त्यांना ‘लाक्षणिक आराम’ आणि ‘व्याधीमुक्त होणे’, यांतील भेद लक्षात येत असतो.

३. पथ्यपालनाविषयी ते तुलनेत अधिक सजग, काटेकोर आणि आग्रही असतात.

४. त्यांना आयुर्वेदाच्या मूलभूत संकल्पना जाणून घेण्यात रस असतो.

ही सगळी निरीक्षणे तौलनिक असून सरसकट नियम नाहीत. बाकीच्या क्षेत्रातील लोकांचे याकडे दुर्लक्ष आहे, असे नाही; पण अन्य क्षेत्रांच्या तुलनेत ‘आयटी’मध्ये लक्षात येईल, इतपत अधिक प्रमाण आहे इतकेच ! गलेलठ्ठ वेतन कमवूनही मानसिक शांतता विकत घेता येत नाही, याची जाणीव झाल्याने या विशेषत: या क्षेत्रातील लोकांचा अध्यात्म, धार्मिकता याकडेही ओढा वाढत आहे. येणार्‍या काळातील शारीरिक आणि मानसिक व्याधींचे होणारे स्फोट लक्षात घेता हा सगळा अतिशय सकारात्मक पालट आहे !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१०.२.२०२४)