अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !

यापुढे भाजपसाठी निष्ठेने काम करणार ! – अशोक चव्हाण

बोलताना अशोक चव्हाण

मुंबई – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांसह भाजपचे अन्य नेते उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘यापुढे भाजपसाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार आहे. भाजपमध्ये मी कुठल्याही पदाच्या लालसेने आलेलो नाही. त्यामुळे पक्ष मला देईल ते दायित्व स्वीकारून पूर्णपणे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून राज्याच्या विकासासाठी मी काम करणार आहे.’’