मॉरिसची पोस्ट आणि गोळीबारापूर्वीचा संवाद चर्चेत

मॉरिस नोरान्हा व ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर

मुंबई – ८ फेब्रुवारी या दिवशी मॉरिस नोरान्हा याने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर यांना गोळ्या घालून स्वतःला गोळ्या घालून घेतल्या. यापूर्वी, म्हणजे २९ जानेवारीला त्याने पुढील अर्थाची पोस्ट इंग्रजीत प्रसारित केली होती. ‘तुम्ही अशा माणसाला हरवू शकत नाही, ज्याला त्याची दुःख, तोटे, अनादर, मन दुभंगणे, नकार यांविषयी काहीच वाटत नाही.’ त्यानंतर १० दिवसांनी वरील घटना घडली.

हत्येच्या काही वेळ आधीही ‘फेसबुक लाईव्ह’मध्ये अभिषेक घोसाळकरांच्याच बाजूला बसून त्याने ‘आज बहुत सारे लोग सरप्राईज होंगे.’ (आज पुष्कळ लोकांना आश्चर्य वाटेल) या संवादानंतर पुढच्या ५ ते ७ मिनिटांत त्याने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या घातल्या.