‘कु. भार्गवी सूर्यकांत देशमुख हिची मला (भार्गवीच्या आईला) जाणवलेली गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
‘वर्ष २०१५ मध्ये ‘कु. भार्गवी सूर्यकांत देशमुख उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्याित्मक पातळी ५३ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१७.१.२०२४) |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. वय – ४ ते ७ वर्षे
१ अ. कु. भार्गवी लहानपणापासून शांत आणि अबोल आहे.
१ आ. दळणवळण बंदीच्या कालावधीत भार्गवी लहान लहान रांगोळ्या काढायला शिकली. आता ती प्रतिदिन दारासमोर रांगोळी काढते.
१ इ. स्वतःला पालटण्याची तळमळ : आधी भार्गवी पुष्कळ कर्कश आवाजात ओरडत असे. तिने मला यासाठी ‘स्वयंसूचना कशी घेऊ ?’, असे विचारले. तेव्हा मी तिला स्वयंसूचना बनवून दिली. तिने काही दिवस स्वयंसूचना घेतल्यावर तिचे मोठ्याने ओरडणे बंद झाले.
१ ई. व्यष्टी साधनेचा आढावा देणे : दळणवळण बंदीच्या कालावधीत बालसाधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा असायचा. भार्गवीचा मोठा भाऊ (कु. यशराज सूर्यकांत देशमुख, आध्यात्मिक पातळी ५५ टक्के) व्यष्टी साधनेचा आढावा देत असे. तेव्हा त्याचे अनुकरण करून भार्गवीही तिने केलेल्या साधनेच्या प्रयत्नांचा आढावा देत असे.
२. वय ७ ते ९ वर्षे
२ अ. ऐकण्याची वृत्ती : भार्गवी समंजस आहे. ती सांगितलेले ऐकते. पूर्वी जेवतांना ती ताटात अन्न टाकत असे; पण तिला अन्नाचे महत्त्व सांगितल्यापासून ती ताटात अन्न टाकत नाही.
२ आ. ती घरातील छोट्या छोट्या कामात मला साहाय्य करते.
२ इ. भार्गवी शाळेत सर्वांशी प्रेमाने वागते.
२ ई. ती शाळेत काही कार्यक्रम असेल, तर भाषण करते आणि इतर कार्यक्रमात भाग घेते.
२ उ. भार्गवी हुशार आहे. ती नेहमी गीता आणि मनाचे श्लोक यांच्या पाठांतर स्पर्धेत वरचा क्रमांक मिळवते.
२ ऊ. बालकक्षाच्या ठिकाणी सेवेत भाग घेणे : भार्गवी लहानपणापासून कार्यक्रमाच्या वेळी बालकक्षाच्या ठिकाणी तिच्या भावाच्या समवेत सेवा करत असे. ती लहान असल्यामुळे तिला इतरांसह घोषणा द्यायला सांगत असत. या वर्षी गुरुमाऊलीच्या कृपेने तिला घोषणा देण्याची संधी मिळाली. भार्गवीने ही सेवा उत्स्फूर्तपणे केली. ती घोषणा देतांना आनंदी आणि उत्साही दिसत होती. तिने या वर्षी सातारा येथील नामदिंडीतही घोषणा दिल्या.
२ ए. चुकांविषयी गांभीर्य असणे : बालकक्षाच्या ठिकाणी सेवा करतांना तिला सांगितलेले पालट तिने लगेच स्वीकारले. बालकक्षाचे दायित्व असलेल्या साधिकेने सांगितले, ‘‘तिने इतरांच्या चुकाही त्वरित लक्षात आणून दिल्या.’’
२ ऐ. गाणे शिकतांना कृष्णाचे अस्तित्व जाणवणे : भार्गवी गाणे शिकण्यासाठी जात होती. तेव्हा तिने मला सांगितले, ‘‘गाणे शिकवणार्या ताई गात असतांना मला बासरीचा आवाज ऐकू येत होता. तेथे कृष्ण आहे’, असे मला वाटत होते.’’ हे ऐकल्यावर माझी भावजागृती झाली.
२ ओ. धर्माचरणाची आवड : भार्गवीला धर्माचरण करायला आवडते. ती प्रतिदिन कुंकू लावते. तिला सात्त्विक कपडे आवडतात.
२ औ. स्वभावदोष : आळस आणि कधी कधी हट्टीपणा करते.
गुरुमाऊली, आपल्याच कृपेने मला उच्च स्वर्गलोकातील मुले मिळाली आहेत. भगवंता, ‘त्यांना साधनेत टिकवून ठेवण्यासाठी तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
– सौ. अस्मिता सूर्यकांत देशमुख (भार्गवीची आई), सातारा (१०.८.२०२३)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |