Worm In Cadbury Chocolate : भाग्यनगर (तेलंगणा) येथे कॅडबरी चॉकलेटमध्ये आढळली जिवंत अळी !

सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला व्हिडिओ !

भाग्यनगर (तेलंगाणा) – कॅडबरी चॉकलेटमध्ये जिवंत अळी सापडल्याचा एक व्हिडिओ येथील रॉबिन झॅकियस नावाच्या व्यक्तीने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. त्याने विचारले आहे, ‘या अशा खाण्याविषयीचा कालावधी संपत आलेल्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी कुठली यंत्रणा आहे का ? सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भातील या अक्षम्य हलगर्जीपणासाठी कोण उत्तरदायी आहे ?’  या व्हिडिओसमवेत  खरेदीचे देयकही दिसत आहे.

रॉबिन यांच्या पोस्टवर ‘कॅडबरी डेअरी मिल्क’ने उत्तर दिले आहे. यात म्हटले आहे की, ‘मंडेलेज इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेड’ नेहमीच उत्पादनांचा उच्च दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील असते. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कृपया तुमची तक्रार  [email protected] वर पाठवा. त्यासमवेत तुमचे पूर्ण नाव, पत्ता, दूरभाष क्रमांक आणि खरेदीची माहिती द्या, अशी विनंती करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अन्न आणि औषध प्रशासनाला अशा गोष्टी दिसत नाहीत का ?