Wireless EV Charging : इलेक्ट्रिक वाहन महामार्गावरून धावतांनाच होईल भारित !

केरळने बनवला मार्गदर्शक प्रकल्प

कोच्ची – महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता ‘चार्जिंग स्टेशन्स’ची आवश्यकता भासणार नाही. केरळने वायरलेस ‘इव्ही चार्जिंग’ सुविधेसाठी ‘मार्गदर्शक प्रकल्प’ बनवला आहे. देशातील या पहिल्या ‘वायरलेस चार्जिंग’ प्रकल्पाच्या अंतर्गत रस्त्यांखाली तांब्याची तारेचे जाळे निर्माण केले जाईल.

या ‘वायरलेस चार्जिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता रस्त्वारून धावणारी गाडीही भारित (चार्ज) करता येणे शक्य आहे. पुढील वर्षापासून ‘ड्राइव्ह अँड चार्ज रोड प्रोजेक्ट’ चालू होईल, अशी आशा अतिरिक्त मुख्य सचिव के.आर्. ज्योतीलाल यांनी व्यक्त केली.