नागपूर – मावळते पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे फेसबुक खाते हॅक झाले आहे. ‘हॅकर्स’ने फेसबुक खात्यावरून त्यांच्या मित्रांकडे पैशांची मागणी केली होती. त्यांच्याप्रमाणे आता नवे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांचेही फेसबुक खात हॅक करण्यात आले आहे. आरोपीने त्यांच्या खात्यावरून आपल्या ‘सी.आर्.पी.एफ्.’मध्ये कार्यरत मित्राला साहाय्य करण्याची विनंती केली आहे.
आरोपीने रवींद्र कुमार या नावाने फेसबुकवर मैत्रीसाठी विनंती पाठवली. नंतर त्यावरूनच संभाषण केले. आपण रवींद्र सिंगल यांचा मित्र ‘सी.आर्.पी.एफ्.’ अधिकारी असल्याचे भासवून स्थानांतर झाल्याचे सांगितले. ‘बदली झाल्यामुळे घरातील सामान विक्री करायचे आहे’, असे सांगितले. आरोपीच्या जाळ्यात किती लोक आले ? याची माहिती नाही. (पोलीस अधिकार्यांचे खाते हॅक होणे हे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! – संपादक)