‘साधनेला सुरुवात केल्यावर ‘एखादी घटना घडण्यामागे बहुतांश वेळा आध्यात्मिक कारणांचे प्रमाण अधिक असते’, हे कळल्यानंतर मी प्रत्येक वेळी आध्यात्मिक स्तरावरील कारणांचा शोध घेत असतो, उदा. ‘गेल्या ४-५ शतकांमध्ये भारतावर परकियांनी आक्रमणे का केली, याची मानसिक आणि बौद्धिक कारणे अनेक सांगितली जातात. माझ्या दृष्टीने महत्त्वाचे कारण म्हणजे, ‘हिंदूंनी साधना करण्याचे सोडल्यामुळे त्यांच्यामधील सत्त्वगुण कमी झाला. त्यामुळे रज-तम अधिक असणार्या परकियांना हिंदूवर सहजतेने आक्रमणे करता आली.’ माझ्या अशा आध्यात्मिक पार्श्वभूमीमुळे मला कोणत्याही विषयाच्या संदर्भातील मानसिक किंवा बौद्धिक स्तरावरील लिखाण करणे कठीण जात आहे. त्यामुळे आता मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील ज्ञान असणारे अनेक ग्रंथ वाचल्यावर मला ते थोडेफार समजू लागले आहे. ’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले