प्रभो मज एकचि वर द्यावा।

‘चैत्र कृष्ण सप्तमी या दिवशी माझे यजमान श्री. नितीन सहकारी यांचा वाढदिवस होता. वाढदिवस म्हटला की, व्यावहारिक जीवनात मौज-मजा करणे आणि भेटवस्तू देणे-घेणे आलेच;  याउलट साधकाच्या जीवनात ‘गुरुचरण’ हेच सर्वस्व असते. ‘वाढदिवसाच्या िदवशी साधकाच्या मनात कोणता भाव असेल ?’, या विचारात असतांना ‘प्रभो मज एकचि वर द्यावा। या चरणांच्या ठायी माझा निश्चल भाव असावा।।’, हे हनुमानाचे भावावस्थेतील बोल आठवले आणि मला पुढील काव्य स्फुरले.

श्री. नितीन सहकारी
सौ. श्रुति सहकारी

प्रभो मज एकचि वर द्यावा।
देह हा तव सेवेसाठी झिजावा।। १।।

सेवारूपी कृपाप्रसाद मिळावा।
अंती द्या तव चरणी विसावा।। २।।

देह तुझाच, श्वासही तुझा।
प्रज्ञा तुझी, भक्तीही तुझी।। ३।।

सारे तुझेच असता ‘मी’ हा विरघळो।
आस एक हृदयी, जीव तुझ्यात विलीन होवो।। ४।।

उघडी तू ज्ञानाचे भांडार।
करी दूर अज्ञानाचा अंधकार।। ५।।

लक्ष लक्ष दीप उजळू दे।
तेजोमय प्रकाशात जीव न्हाऊन निघू दे।। ६।।

जसा रामदूत हनुमंत।
तसा मम हृदयी जयंत (भगवंत) (टीप)।। ७।।

नमन तव चरणी शत शत।
व्हावे दोहोंचे अद्वैत।। ८।।

नसे हा वाढदिवस सोहळा।
असती प्रार्थनापुष्पांच्या माळा।। ९।।

कृतज्ञतेने अर्पिन तव पदकमला।
आनंद भरे तन-मन, भावविभोर ही काया।। १०।।

टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’

– सौ. श्रुती नितीन सहकारी (श्री. नितीन सहकारी यांच्या पत्नी), फोंडा, गोवा.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक