Kashi Vaidik Education : काशी येथे दक्षिण भारताचे सर्वांत मोठे वेद विद्येचे केंद्र उभारले जाणार !

छायाचित्र सौजन्य : LOCAL18

वाराणसी (उत्तरप्रदेश) – शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या आदेशानुसार दक्षिण भारतात वेदांचा प्रचार करण्यासाठी सनातन धर्म सेवा ग्राम योजनेच्या अंतर्गत वाराणसीमध्ये एक मोठे केंद्र उभारले जाणार आहे, अशी माहिती येथील कांची कामकोटी पीठाचे व्यवस्थापक व्ही.एस्. सुब्रह्मण्यम् मणी यांनी दिली.

मणी पुढे म्हणाले की, या केंद्रात २ योजनांतर्गत वेदविद्या शिकवली जाईल. पहिली पूर्णवेळ वेद विद्या योजना असेल. या अंतर्गत विद्यार्थ्यांना स्थानिक श्रुती परंपरेतून वेदविद्या शिकवली जाईल. यामध्ये पूजापद्धतीपासून ते कर्मकांडापर्यंतचे संपूर्ण शिक्षण दिले जाणार आहे. याखेरीज दुसर्‍या भागात वेद शिक्षण योजनेच्या अंतर्गतही अभ्यास केला जाणार आहे.

संपादकीय भूमिका

देशातील प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे केंद्र बांधून तेथे वेद, तसेच धर्मशिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकर यांनी पुढाकार घेतला पाहिजे !