एकवचनी श्रीराम !

श्रीराम अवतार

एखादा मुद्दा सत्य आहे, असे ठासून सांगायचे असल्यास आपण तो पुनःपुन्हा सांगतो, मी त्रिवार सत्य सांगतो’ असे म्हणतो. शांतिः । शांतिः । शांतिः ।’ असेही तीन वेळा म्हणतात. त्रिवार सत्यमधील त्रिवार हा शब्द पुढील दोन अर्थांनी वापरलेला आहे.

१. ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची शपथ घेऊन सांगतो.

२. त्रिवार हा शब्द त्रि औ वार (म्हणजे तीन वार) या शब्दांपासून बनला आहे. तीन वारी तेच स्वप्न दिसले, तर त्याला नुसते स्वप्न न म्हणता स्वप्नदृष्टान्त असे म्हणतात. त्यातील सूचनेनुसार वागावे किंवा त्या संदर्भात एखाद्या उन्नतांना विचारावे. तसेच तीन वेळा एखादी गोष्ट ऐकली, तरच ती सत्य समजावी.

श्रीराम मात्र एकवचनी होता, म्हणजे त्याने एकदा काही म्हटले की ते सत्यच असायचे. तो मुद्दा पुनःपुन्हा ठासून तीन वेळा सांगायची जरूर नसायची. कुणी श्रीरामालाही विचारायचे नाही, ‘खरंच का ?’

(संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘श्रीराम’)