Goa PradhanMantri Divyansha Kendra : बांबोळी येथे विकलांगांसाठी देशातील पहिले दिव्यांशा केंद्र

विकलांग आणि ज्येष्ठ नागरिक यांना विनामूल्य साहाय्य मिळणार

देशातील प्रथम दिव्यांशा केंद्राचे उद्धाटन करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर

पणजी, १० जानेवारी : केंद्रशासनाने १० जानेवारीला गोव्यात पहिले ‘पंतप्रधान दिव्यांशा केंद्र’ चालू केले आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (ALIMCO आस्थापन) यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट चालू असतांना हे केंद्र चालू करण्यात आले आहे.

व्हीलचेअर्स, प्रोस्थेटिक्स, श्रवणयंत्रे आणि चष्मा इत्यादी सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरती उपकरणे विकलांग व्यक्ती, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना केंद्रामार्फत विनामूल्य दिली जातील.

याचबरोबर बांबोळी येथील मातृछाया केंद्रात ‘स्पाइनल रिहॅब सेंटर’देखील (मणका पुनर्वसन केंद्रदेखील) चालू करण्यात आले.