अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या लोकार्पणापूर्वी दर्शन घेण्याची विनंती !

नाशिक – अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथील दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात त्यांना अतीप्राचीन काळाराम मंदिराचे दर्शन घेण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती काळाराम देवस्थानचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी २९ डिसेंबर या दिवशी येथे दिली.
महंत सुधीरदासजी महाराज म्हणाले की, नाशिक हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी प्रभु रामचंद्रांचेही वास्तव्य होते. त्यामुळे नाशिकची भूमी श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याची आख्यायिका आहे. यासंबंधीची अनेक पदचिन्हे मंदिरांच्या रूपाने नाशिकमध्ये दिसतात. येथील श्री काळाराम मंदिर एक प्रमुख देवस्थान मानले जाते. प्रभु रामचंद्र वनवासातील काळात पंचवटीत आल्यानतंर त्यांनी येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे या मंदिराला मोठे महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर देवस्थान समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतीप्राचीन काळाराम मंदिराचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले आहे.
पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २ सहस्र ८८५ प्रकरणे : अटक झालेल्यांची माहितीच उपलब्ध नाही !
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार बोगस ! – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बदलापूर येथे बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा !
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !