Bomb Threat RBI : धमकी देणार्‍या धर्मांधासह दोघे जण अटकेत !

बँकेत बाँबस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याचे प्रकरण

मुंबई – मुंबई – येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयासह ११ बँकांच्या कार्यालयात बाँबस्फोट घडवून आणण्याची धमकी देणार्‍या तिघांना गुन्हे शाखेने वडोदरा येथून अटक केली आहे. आरोपींपैकी एकाचे नाव आदिल रफिक असे असून दुसरा त्याचा नातेवाईक वसीम, तर तिसरा रफिकच्या नातेवाईकाचा मित्र आशिष टोपाला आहे. या आरोपींना ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आशिष टोपाला हा उच्चशिक्षित असून त्याला सायबर सेवा, तसेच इंटरनेट यांचे बरेचसे ज्ञान आहे. [email protected] या संगणकीय पत्त्यावरून धमकी देण्यात आली होती. या संगणकीय पत्त्याचा आतंकवादी गटाशी काही संबंध आहे का ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.

सौजन्य : द एकॉनॉमिक टाइम्स

संपादकीय भूमिका 

बाँबस्फोटासारख्या घातक कारवायांमध्ये धर्मांधच सहभागी असतात, हे लक्षात घ्या ! एरव्ही हिंदूंच्या संदर्भात लहानशी घटना घडली, तरी हिंदूंवर आगपाखड करणार्‍या पुरो(अधो)गामी वृत्तवाहिन्या अशा घटनांविषयी चर्चासत्रे आयोजित करत नाहीत, हे लक्षात घ्या !