यवतमाळ येथे तलवारींसह वाहन जप्त करून धर्मांधाला अटक !

प्रतिकात्मक चित्र

यवतमाळ, ५ डिसेंबर (वार्ता.) – येथील इंदिरानगर भागात ५ तलवारींसह एक युवक चारचाकी वाहनातून फिरत असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने पांढरकवडा मार्गावरील स्मशानभूमीजवळ पंचासमक्ष ५ धारदार तलवारींसह टाटा मॅजिक वाहन जप्त करून शेख सलमान (वय ३० वर्षे) या धर्मांधाला कह्यात घेतले. त्याच्यावर भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका :

  • तलवारी घेऊन राजरोसपणे फिरणार्‍या धर्मांधांना कायद्याचे भय नसणे, हे देशासाठी घातक !
  • धर्मांधांकडे धारदार तलवारी कुठून आणि कशासाठी येतात ? याचे सखोल अन्वेषण करून कठोर कारवाई होणार का ?
  • अशा वृत्तांना वाहिन्या प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !