(म्हणे) ‘गोमूत्र राज्यां’मध्येच भाजप जिंकतो !’ – द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार

द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार यांचे संसदेत भाजपच्या निवडणुकीतील विजयावरून गोमातांवरून संतापजनक विधान !

(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार

नवी देहली – देशातील जनतेने विचार केला पाहिजे की, या भाजपची शक्ती मुख्यतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये निवडणूक जिंकणे आहे, ज्यांना आपण सामान्यतः ‘गोमूत्र राज्य’ म्हणतो, असे विधान द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार यांनी संसदेत केले. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी पट्ट्यातील राज्यांच्या विधानसभा निवडणुका भाजपने मोठ्या बहुमताने जिंकल्यावरून त्यांनी हे विधान केले. सेंथिल कुमार यांनी हिंदी पट्ट्यातील राज्यांना ‘गोमूत्र राज्य’ संबोधण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ वर बोलतांना त्यांनी ‘गोमूत्र’ हा शब्द वापरला होता.
बिहारमधील भाजप नेते नवल किशोर यादव या विधानावर म्हणाले की, जे हिंदी भाषिक राज्यांचा असा उल्लेख करतात, त्यांच्यावर मानसिक उपचार करावे लागतील. येत्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली या लोकांवर उपचार केले जातील.

सेंथिल कुमार यांच्या विधानाशी आमचा संबंध नाही ! – काँग्रेस

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, संसदेत एक व्यक्ती काय बोलत आहे ? याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, हे त्यांचेच विधान आहे. आम्ही गोमातेचा  आदर करतो, यावर मला काहीही म्हणायचे नाही.

संपादकीय भूमिका

  • जर भाजप गोमूत्रामुळे जिंकत असेल, तर तो गोमातेचा आशीर्वादच समजावा लागेल ! सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा राजकीय विनाश होणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !