उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. गणराज हडकर हा या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
चि. गणराज देवानंद हडकर याच्याविषयी त्याचे आई-वडील आणि २ आत्या यांना जाणवलेली सूत्रे अन् त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत.
१. सौ. दीक्षिता हडकर (गणराजची आई), डोंबिवली (प.), ठाणे
१ अ. आनंदी : ‘गणराजला कधी बरे वाटत नसले, तरी त्याचा चेहरा नेहमीच हसरा आणि आनंदी असतो. त्याच्याकडे पाहून ‘त्याला बरे नाही’, असे वाटत नाही.
१ आ. प्रेमळ
१ आ १. कुडाळ सेवाकेंद्रातील साधक आणि बालसाधक यांना स्वतःच्या हाताने प्रेमाने चॉकलेट भरवणे : ११.५.२०२३ या दिवशी प.पू. डॉक्टरांचा ब्रह्मोत्सव सोहळा होणार होता. या सोहळ्यासाठी यजमान श्री. देवानंद हडकर गोव्याला जाणार होते; मात्र गणराजचा पाय दुखत असल्यामुळे आम्ही गोव्याला जाणार नव्हतो. तो सोहळा ‘ऑनलाईन’ पहाण्यासाठी मी, माझी मोठी मुलगी कु. हर्षदा (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ११ वर्षे), मधली मुलगी कु. तेजस्विता (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय ७ वर्षे) आणि चि. गणराज (वय ४ वर्षे) दोन दिवस कुडाळ सेवाकेंद्रात रहायला गेलो. गणराजजवळ चॉकलेटची पिशवी होती. आम्ही सेवाकेंद्रात गेल्यावर गणराज सेवाकेंद्रातील बालसाधक, साधक आणि साधिका यांना त्याच्याजवळचे चॉकलेट भरवत होता.
१ इ. अनुभूती : कुडाळ सेवाकेंद्रात गेल्यावर ब्रह्मोत्सव सोहळा चालू होण्याआधीच गणराज भूमीवर पाय टेकवून चालू लागला.
१ ई. सेवेची आवड : ब्रह्मोत्सव सोहळा संपल्यानंतर हर्षदा, तेजस्विता आणि एक बालसाधिका पाण्याच्या बाटल्या वरच्या माळ्यावरून खाली आणायची सेवा करत होत्या. तेथील एका साधिकेने गणराजला विचारले, ‘‘गणराज, तूही पाण्याच्या बाटल्या खाली घेऊन जाणार का ?’’ गणराज लगेच ‘‘हो’’, म्हणाला.
१ उ. श्रद्धा
१. गणराजला काही त्रास होऊ लागल्यास त्याचे बाबा संतांना गणराजसाठी नामजपादी उपाय विचारतात. त्यांना उपाय विचारल्यावर गणराजला लगेच बरे वाटते. आम्ही गणराजला ‘बरे वाटते का ?’, असे विचारल्यावर तो म्हणतो, ‘‘कृष्ण आला आणि त्याने मला बरे केले.’’
२. गणराजला बरे नसते, तेव्हा तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ आणि प.पू.भक्तराज महाराज यांचे छायाचित्र जवळ घेतल्याविना रहात नाही.
१ ऊ. भाव
१ ऊ १. देवाविषयी असलेला भाव : काही मासांपूर्वी मी देवाची पूजा करतांना देवतांची चित्रे पुसून खाली भूमीवर ठेवत होते. तेव्हा गणराज मला म्हणाला, ‘‘आई, देवाची चित्रे पुसून भूमीवर ठेवू नको. गुरुदेवांना आवडणार नाही.’’ लगेच त्याने त्या चित्रांना नमस्कार केला.’
१ उ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव : ‘मागील वर्षी घरामध्ये एक चिमणी आली होती. ती देवघरात गेली आणि प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रावर बसली. तेव्हा गणराज मला म्हणाला, ‘‘प.पू. डॉक्टरांना आवडते; म्हणून ती त्यांच्याजवळ जाऊन बसली.’’
२. श्री. देवानंद हडकर (गणराजचे वडील), डोंबिवली (प.), ठाणे.
२ अ. वडिलांचा हात दुखत असतांना ‘श्रीकृष्ण दुखणारा हात बरा करणार आहे’, असे सांगणे : ‘मी बाहेर जातो, तेव्हा गणराजला माझ्यासह यायचे असते. तो मार्गाने चालत नाही आणि ‘मला कडेवर घ्या’, असे म्हणतो; म्हणून मी त्याला म्हणालो, ‘‘माझा हात दुखत आहे. मला तुला कडेवरून न्यायला जमणार नाही.’’ तेव्हा माझा हात जिथे दुखत होता, तिथे स्वतःचा हात लावून तो मला म्हणाला, ‘‘श्रीकृष्ण हात बरा करणार आहे.’’ हे ऐकून माझी भावजागृती झाली आणि ‘एवढ्या लहान वयात त्याला असे बोलायला कसे सुचते ?’, असे वाटले. ‘गुरुदेवांचे त्याच्याकडे किती लक्ष आहे ?’, याची मला जाणीव झाली.’
३. श्री. देवानंद आणि सौ. दीक्षिता हडकर
३ अ. बहिणीची प्रेमाने काळजी घेणे : ‘एकदा तेजस्विताच्या पोटात दुखत होते. दुपारी गणराज महाप्रसाद ग्रहण करण्यास बसला होता. तेव्हा तो त्याच्या ताटातील महाप्रसाद तेजस्विताला भरवून नंतर स्वतः ग्रहण करत होता.’
४. सुश्री (कु.) सविता हडकर (गणराजची आत्या), तोंडवळी (मालवण, जि. सिंधुदुर्ग)
४ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतःजवळ आहेत’, असा भाव असणे : ‘एकदा गावी असतांना मी तेजस्विताला जवळ घेतले आणि गणराजला म्हणाले, ‘‘बघ, ही माझ्याजवळ आहे. तुझ्याजवळ कोण आहे ?’’ तेव्हा तो लगेच उस्त्फूर्तपणे म्हणाला, ‘‘माझ्याजवळ गुरुदेव आहेत.’’
५. सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर (गणराजची आत्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘तोंडवळी (गावी) येथील घरी आल्यावर गणराज सर्वांमध्ये मिसळतो. तो प्रेमाने सर्वांना आपलेसे करून घेतो. सर्वांच्या जवळ जाऊन सर्वांची आपुलकीने विचारपूस करतो.
आ. तो प्रसाद आणि महाप्रसाद पूर्ण ग्रहण करतो. पानात काही शिल्लक ठेवत नाही. त्याला जेवढे हवे, तेवढेच तो घेतो.
५. स्वभावदोष : हट्टीपणा, राग येणे, भ्रमणभाषवर खेळ खेळणे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २२.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |