हवाई – अमेरिकेच्या हवाईच्या कौई बेटावर १४ लाख किलो ग्रॅनाइटचा वापर करून भव्य हिंदु मंदिर उभारण्यात आले आहे. हे मंदिर सर्व बाजूंनी सुंदर वन आणि उद्यान यांनी वेढलेले आहे. हे मंदिर दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरांच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे. या मंदिरात मुख्य देवता म्हणून शिवलिंग स्थापित केले आहे.
१. हवाई बेटाची लोकसंख्या सुमारे १४ लाख आहे. त्यांपैकी १ टक्क्यापेक्षा अल्प हिंदू आहेत. कौई बेटावरील एका संकुलात २४ साधू रहातात. ते हिंदु धर्मातील शैव विचारसरणीचे पालन करतात.
२. हे मंदिर यांपैकी एक असणारे परमाचार्य सदाशिवानंद पलानी स्वामी यांनी बांधले. ते वर्ष १९६८ मध्ये त्यांचे गुरु आणि संकुलाचे संस्थापक सुब्रमुनियास्वामी यांच्यासोबत हवाई बेटावर आले होते.
३. सुब्रमुनियास्वामी यांनी एकदा स्वप्नात भगवान शिव एका मोठ्या दगडावर बसलेले पाहिले. त्यानंतर वर्ष १९९० मध्ये मंदिराचे बांधकाम चालू झाले आणि संस्थापकांच्या मृत्यूनंतरही बांधकाम चालू राहिले.
४. ‘विजेमुळे एक प्रकारचा चुंबकीय प्रभाव निर्माण होतो आणि त्याचा मानसिक परिणामही होतो’, अशी सुब्रमुनियास्वामींची धारणा होती. त्यामुळे मंदिरात विजेवर चालणारे बल्ब किंवा ट्युबलाईट्स नाहीत. मंदिरात तेलाचे दिवे लावले जातात.